
आज दि.१३/१२/२०२५ रोजी शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला येथे मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक साहेब, अकोला यांनी सन २०२५ चे वार्षिक निरीक्षण निमीत्त वाहतुक शाखा येथे भेट देवुन कामकाजाचा आढावा घेतला तसेच सर्व अधिकारी/अंमलदार यांना अमुल्य मार्गदशर्न करून सुचना दिल्या.सर्व प्रथम मा. श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक साहेब, जिल्हा अकोला यांना वाहतुक शाखा प्रभारी पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी मानवंदना देवुन वार्षिक निरीक्षणची सुरूवात करण्यात आली. मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी निरीक्षण दरम्यान वाहतुक अधिकारी/अंमलदार यांचे टर्न आउट पाहणी करून काही अंमलदार यांना प्रशस्ती दिली तर काही अर्मलदार यांना समज देखील देण्यात आली आहे.तसेच वाहतुक शाखा येथील कार्यालयाचे कामाकाजाची पाहणी करून मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी वाहतुक शाखा कार्यरत अधिकारी/अंमलदार यांचे दरबार घेवुन त्यांचे अडीअडचणी समजुन घेण्यात आल्या. तसेच मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी वाहतुक शाखेचे कामकाजा मध्ये सुधारणा करणेबाबत खालील प्रमाणे सुचना देतुन मार्गदर्शन केले.१. वाहतुक पोलीस जिल्हा पोलीस दलाचे बॅन्ड अॅम्बेसेडर असल्याने त्या प्रमाणे वाहतुक अंमलदारांनी स्वतःचे वर्तन ठेवावे.२. शहरातील वाहतुक व्यवस्था सुधारण्या करीता वाहतुक अधिकारी / अंमलदार यांनी महत्वाच्या सर्व पॉईन्टवर सतर्क हजर राहुन कर्तव्य करावे.पीक अवर्स मध्ये वाहतुक अंमलदार यांनी चौकामध्ये दर्शनी भागावर हजर राहणे३. ४. चौकामध्ये स्टॉपलाईनचे पालन तसेच सिग्नल जम्पींग होणार नाही याबाबत वाहतुक अंमलदारांनीकार्यवाही करावी.५. नो पार्कीग मध्ये वाहणे उभे राहणार नाही या करीता कार्यवाही करावी.६. वाहतुक कर्तव्या दरम्यान जनतेशी सौजन्याने वागणे.७. वाहतुक अधिकारी/अंमलदार यांनी कर्तव्य करतांना कोणतेही अमीशाला बळी न पडता कायदेशीर कर्तव्य करावे.८. वाहतुक नियंमांचे पालन करण्याकरीता जनतेस व वाहन धारकांना प्रोत्साहीत करण्याकरीता वाहतुक शाखे मार्फत कार्यक्रम राबवावे.वार्षिक निरीक्षण पाहणी दरम्यान मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी वाहतुक शाखा अधिक सक्षम व प्रभावीपणे काम करून अकोला जिल्हा पोलीस दलाचे नाव लौकीक करतील असे अमुल्य मार्गदर्शन आज रोजी वार्षिक निरीक्षण पाहीणी संपन्न करण्यात आले.






