
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / नरेश राऊत
एका प्रकरणात सेटलमेंट करुन देण्याच्या नावाखाली तब्बल पाच लाखाची लाच मागणाऱ्या ठानेदाराला अमरावती एसबीच्या पथकाने शुक्रवारी ( ता. 12 ) अवधुतवाडी पोलिस ठाण्यात रंगेहात अटक केली. त्या लाचखोर ठाणेदरास शनिवारी ( ता. 13 ) रोजी न्यायालयात हजर केले. असता न्यायालयाने दोन दिवसांचा पिसीआर ठोठावला आहे. चोकशी दरम्यान या प्रकरणात मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी यवतमाळ व मुळ गावी राहत असलेल्या ठाणेदाराच्या संपत्तीची देखील एसीबी कडून चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.नरेश रमेशराव रणधीर ( पोलिस निरीक्षक ) वर्ग 1- मूळ गाव रा. अमळनेर , जिल्हा जळगाव ह. मु. यवतमाळ असे अवधुतवाडी पोलीस स्टेशनच्या लाचखोर ठाणेदाराचे नाव आहे. ठाण्यात आलेल्या प्रत्येक तक्रारीत दोन्ही बाजने कशी तडजोर होईल हीच भूमिका ठेवण्याचा नवा पायंडा अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये उभा झाला होता दरम्यान 11 डिसेंबरला एका तक्रारदाराने अवधूतवाडी ठाणे गाठून तक्रार दिली त्याच्या एका मित्राला पैशाची गरज असल्याने त्याने मध्यस्थी करुन दुसऱ्या मित्राकडून 10 लाख रुपये सहा महिन्यांसाठी दिले. माञ त्याने पैसै काही परत केले नाहीत. त्यामुळे सदर फिर्यादी 10 डिसेंबरला ठाण्यात धडकला , आपला मिञ पैसे परत करीत नसल्याची तक्रार त्याने दिली. दरम्यान ठाणेदार नरेश रणधीर यांनी तक्रारदाराला तुझे पैसे मिळवुन देतो. माञ त्या मोबदल्यात पाच लाख रुपये दे अशी मागणी केली. सदर फिर्यादीने तशी तक्रार लेखी अमरावती येथील लाचलुपत प्रतिबंधक विभागाकडे केली. दरम्यान एसीबीने सापळा रचून ठाणेदार नरेश रणधीर यांना रंगेहात अटक केली. पोलीस अधीक्षक कुमार चिंता आता ठाणेदार रणधीर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करून तो पुढे पाठविला जाणार आहे. अशी माहिती देखील पोलीस सूत्रांकडून दिली आहे. प्रकरणात चौकशी दरम्यान काही बडे मासे गळाला लागन्याची शक्यता आहे. परिणामी, पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे.बॉक्स *पंटरच्या मुसक्या आवळन्याची गरज*▫️ एका पोलीस ठाण्यातील एका पथकातील काही जणांच्या ‘ पंटर कारवाया अलीकडे भलत्याच चर्चेत येत आहेत. वास्तविक पथकांनी आपण पोलीस असल्याचा गौरव वाढवायला हवा. माञ, तसे घडत नाही. अनेकदा आपले पंटर काही अवैध्य धंद्याच्या ठिकाणी ग्राहक म्हणून पाठवायचे. दोघा – तिघांनी तिथे जाऊन धाड टाकण्याचे चित्र रंगवायचे व तेथेच तडजोडी करायच्या , हा प्रकार सुरु आहे. माञ या सर्व बाबींकडे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक हे अनभिज्ञ असल्याची वस्तुस्थिती आहे . सर्वसामान्य जनतेला पोलीस ठाण्यात येण्याची भीती वाटावी , असा प्रकार काही पोलीस ठाण्यात वाढला आहे. त्यामुळे कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थांसोबतच अशा लाचखोर प्रवृत्तीवरही लक्ष्य देण्याची गरज आहे.






