अकोल्यातील ३० बालवैज्ञानिक थेट ISRO कडे !ग्रामीण-शहरातील मुलांनी दाखवली वैज्ञानिक ताकद, अकोल्याचा डंका देशपातळीवर

0
3

अकोला मनीष राऊत :क्रिकेट-मोबाईलच्या जगातून बाहेर पडत अकोल्यातील ३० बालवैज्ञानिक विद्यार्थ्यांनी थेट ISRO पर्यंत झेप घेतली आहे. जिल्ह्यातील विज्ञानविषयक उपक्रमातून या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, आता हे विद्यार्थी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहेत.आज जिथे शैक्षणिक गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, तिथे अकोल्याच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांमध्ये आपली क्षमता ठासून सिद्ध केली आहे. रॉकेट, उपग्रह, अवकाश संशोधन प्रत्यक्ष पाहण्याची संधी या मुलांना मिळणार असून, हा अनुभव त्यांचे आयुष्य बदलणारा ठरणार आहे.प्रशासनाकडून निव्वळ औपचारिकता नव्हे, तर गुणवत्तेला थेट संधी !या उपक्रमात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. हा दौरा म्हणजे अकोल्याच्या शैक्षणिक प्रगतीचा ठोस पुरावा !ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ISRO सारख्या संस्थेपर्यंत पोहोचवणारा हा उपक्रम म्हणजे केवळ अभ्यास दौरा नसून, भावी वैज्ञानिक घडवण्याची सुरुवात आहे.आजचे हे बालवैज्ञानिकच उद्याचे भारताचे शास्त्रज्ञ असतील !अकोल्याने पुन्हा एकदा सिद्ध केले – प्रतिभेला संधी दिली, तर इतिहास घडतो!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here