
भद्रावती तालुका प्रतिनिधी/ सुनिल दैदावार सिलांबम म्हणजे – लाठीकाठि, तलवार,दांड पट्टा, सरुल,यांचा वापर करून 06 स्पर्धा प्रकारात खेळला जाणारा खेलो इंडिया – भारत सरकार , स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया द्वारा मान्यताप्राप्त प्राचीन भारतीय पारमपारिक युद्ध कला खेळ- भारतीय संस्कृती चे जतन व प्रसार करण्याच्या एकमात्र उद्देशाने चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेचुअर सिलंबम असोसिएशन व आयुषी स्पोर्टस् अकादमी, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने *शिवराय चषक महाराष्ट्र स्टेट सिलंबम चॅम्पियनशिप चे आयोजन नुकतेच विश्वकर्मा मंगल कार्यालय, भद्रावती येथे करण्यात आले होते महाराष्ट्र राज्यात 2008 पासुन सर्वप्रथम सिलंबम क्रीडा प्रकाराचे सर्व जिल्ह्यात प्रशिक्षण सुरू करणारे एकमात्र सिनियर इंटरनॅशनल सिलंबम एक्सपर्ट मास्टर संजय बनसोडे सर ,सिलंबम स्पोर्टस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्र , पुणे यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली या स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धा मधे महाराष्ट्र राज्यातील 23 जिल्ह्यातील सिलंबम खेळाच्या 298 खेळाळु मुला मुलींनी सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक चंद्रपूर जिल्हांनी पटकाविला तर व्दितीय क्रंमाक यवतमाळ जिल्हानी आणि तृतीय क्रंमाक पुणे जिल्हानी पटकाविला.या स्पर्धा मधे *सर्वोत्कृष्ट चॅम्पियन* मुली मधे कु श्रिया दिंडे, ( 03 गोल्ड मेडल ,01 सिल्व्हर मेडल सह) पुणे तर मुलानं मधे दीक्षांत रामटेके यांनी 03 गोल्ड मेडल व 01 सिल्व्हर मेडल सह *सर्वोत्कृष्ट चॅम्पियन* ची चॅम्पियन्स ट्रॉफी चा सन्मान इंटरनॅशनल सिलंबम एक्सपर्ट कोच अँड रेफरी मास्टर संजय बनसोडे सर यांच्या हस्ते देण्यात आला.या स्पर्धा च्या यशस्वी आयोजन करण्यासाठी चंद्रपुर डिस्ट्रिक्ट अमेच्युअर सिलांबम असोसिएशन चे पदाधिकारी अध्यक्षा सौ शीतल रामटेके, सचिव बी एल करमनकर, राकेश राय, करण डोंगरे,अशोक कामडे, गणेश राठोड, पांडुरंग भोयर, जनार्दन कुसराम, क्रांती भुषण यादव, प्रीतम सोनवणे,सुरेंद्र सिंग चंदेल, संदीप पंधरे, दीक्षांत रामटेके, सिनु रामटेके,संजय माटे, लक्ष्मण घुगरे, गौतम भगत, उल्फाटद्दीन सय्यद, चीन्नी दोपाला,प्रशांत पारोधे, शीतल वालदे,रुपेश सोमलकर, सतीश कवाडे, विलास गायकवाड, रोशन आडे, सौ किरण राजुरकर,तन्नू आडे, मनीष राऊत, मुग्धा नाळे, सतीश शेळके, शैलेश नगराळे,किशोर झाडे,गोपाल कळमकर,यांनी परिश्रम घेतले.






