प्रभाग १९ मध्ये गजानन लसणकर आणि नीलिमा लसणकर यांच्या नावाची चर्चा; “उमेदवार असावा तर असा” नागरिकांचा सूर

0
13

अमरावती:महानगरपालिका निवडणूक २०२६ चे वारे वाहू लागले असून, प्रभाग क्रमांक १९ (नवाथे-साईनगर) मध्ये सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे. अधिकृत उमेदवारीची घोषणा अद्याप झाली नसली, तरी “आमचा नगरसेवक कसा असावा?” या प्रश्नावर नागरिक आता समाजसेवक श्री. गजानन पांडुरंग लसणकर आणि सौ. नीलिमा गजानन लसणकर यांच्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत.गल्लीबोळात लसणकर दाम्पत्याच्या कार्याचा गौरवनवाथे आणि साईनगर परिसरातील प्रत्येक गल्लीत, चौकात आणि घराघरात सध्या लसणकर दाम्पत्याने केलेल्या सामाजिक कामांची चर्चा सुरू आहे. कोणत्याही पदावर नसतानाही लोकांच्या अडीअडचणीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव नागरिकांच्या मनाला भावला आहे.

‘तुमच्या विश्वासाचा माझा ध्यास, प्रभागाचा सर्वांगीण विकास’ ही भावना जनमानसात रुजताना दिसत असून, “यंदाच्या निवडणुकीत लसणकर दाम्पत्यासारख्या दातृत्वाच्या व्यक्तींनी रिंगणात उतरावे,” अशी मागणी नागरिक उघडपणे करत आहेत.राणा दाम्पत्याचे खंदे समर्थकआमदार रवी भाऊ राणा आणि माजी खासदार नवनीत कौर राणा यांच्या नेतृत्वाखालील विकासकामांचा वारसा लसणकर दाम्पत्य समर्थपणे पुढे नेऊ शकतात, असा विश्वास मतदारांमध्ये दिसून येत आहे. उभे राहून प्रभागाच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लसणकर हेच योग्य व्यक्ती असल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे.जनतेचा कौल आणि वाढता प्रतिसादविशेषतः महिला वर्गामध्ये सौ. नीलिमा लसणकर यांच्याबद्दल मोठी आपुलकी दिसून येत आहे.

प्रभागातील रस्ते, पाणी आणि स्वच्छतेचे प्रश्न सोडवण्यासाठी एका अभ्यासू आणि कार्यक्षम चेहऱ्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अद्याप उमेदवारी निश्चित नसली तरी, जनतेने मात्र आतापासूनच लसणकर यांच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे..”आम्हाला असा प्रतिनिधी हवा आहे जो सुख-दुःखात सोबत राहील. गजाननजी आणि नीलिमा ताई नेहमीच लोकांच्या संपर्कात असतात, त्यामुळे त्यांना यावेळेस संधी मिळायला हवी,” अशा भावना प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here