
बेलगाव चंदनखेडा रोड येथील दुर्घटना भद्रावती तालुका प्रतिनिधी / सुनिल दैदावार पोलिस स्टेशन भद्रावती अंतर्गत गणपती वॉर्ड गवराळा येथील प्रभाकर उद्धव निळे, श्रीमती. बेबी बाई प्रमोद मेश्राम, वैशाली महेश तोडासे रात्री.८.०० वाजता तालुक्यातील कोकेवाडा येथील राईस मिल वर धान भरडाई करिता घेऊन जात असताना ट्रॅक्टर क्रमांक.MH.34 CJ..1839 ट्रॉली क्रमांक MH 34.CJ..2227 बेलगाव चंदन खेडा मार्गावर खड्डा चुकविताना भीषण अपघात झाला.ट्रॅक्टर ट्रॉली वर धानाच्या पोत्यावर बसलेल्या माय लेकी यात दबल्या गेल्या त्यात बेबीबाई प्रमोद मेश्राम यांचे डोक्याला जबरदस्त मार लागल्याने अती रक्तस्त्राव झाला त्यांना तात्काळ चंदनखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्या मृत झाल्याचे निदान झाले. दुसऱ्या गंभीर वैशाली महेश तोडासे या गंभीर दुखापत ग्रस्त झाल्याने त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर प्रभाकर उद्धव निळे यांना किरकोळ मार लागला. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस स्टेशन चे उपनिरीक्षक किशोर मुळे आपल्या ताफ्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रुग्णालयात हलविले.भद्रावती पोलीस स्टेशन येथे दिनांक .१८ . रोजी रात्री.१.०० वाजता तक्रार दाखल करण्यात आली असून फिर्यादी प्रभाकर उद्धव निळे यांचे सांगण्यावरून ट्रॅक्टर चालक किशोर बंडू आत्राम रा. चिरादेवी त. भद्रावती यांचे विरोधात निष्काळजी पनाने वाहन भरधाव चालवून अपघातास कारणीभूत असल्याबाबत भारतीय दंड संहिता ( BNS) 2023 कलम 281, भारतीय दंड संहिता 106 (1) व मोटार वाहन अधिनियम (1988.).134 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली असून पुढील तपास भद्रावती पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.







