निवडणूक विशेष: उमेदवारांच्या ‘दादागिरी’पुढे प्रशासन हतबल? ७ वाजेनंतरही मतदान आणि बोगस मतदानाची चर्चा; नागरिकांचा सवाल- “निवडणूक आयोग कारवाई करणार का?”

0
17
 अकोला जिल्हा प्रतिनिधी मनीष राऊत  ज्वालादीप 

मूर्तिजापूर:येथील स्थानिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, आता सर्वांचे डोळे २१ तारखेच्या निकालाकडे लागले आहेत. मात्र, मतदानाच्या दिवशी शहरातील एका विशिष्ट प्रभागात घडलेल्या प्रकाराने लोकशाहीच्या मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या प्रभागातील काही उमेदवारांनी चक्क निवडणूक नियमांना धाब्यावर बसवून प्रशासनावर दबाव आणल्याची धक्कादायक चर्चा सध्या शहरात रंगली आहे.प्रशासनावर उमेदवारांची दडपशाही?निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मतदानाची वेळ संपल्यानंतर केंद्राचे दरवाजे बंद करणे बंधनकारक असते. मात्र, मूर्तिजापूरच्या या प्रभागात काही स्थानिक उमेदवारांच्या दादागिरीमुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान केंद्राचे गेट उघडे ठेवण्यात आले, असे बोलले जात आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, तिथे तैनात असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्यांनी नियम पाळण्याचा प्रयत्न केला, परंतु उमेदवारांच्या आक्रमक पवित्र्यासमोर आणि दडपशाहीसमोर त्यांना नमते घ्यावे लागले.बोगस मतदानाची ‘व्हायरल’ चर्चाकेवळ वेळ वाढवून घेणेच नव्हे, तर या वाढीव वेळात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा खळबळजनक आरोप आता नागरिक करत आहेत. काय आहे व्हिडिओमध्ये? सोशल मीडियावर या संदर्भातील एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, त्यात काही व्यक्ती मतदान केंद्रावर दादागिरी करताना दिसत असल्याचे समजते.

नागरिकांची भावना: “प्रशासनालाही न जुमानणारे हे उमेदवार उद्या निवडून आले, तर शहराची स्थिती काय असेल?” असा संताप सामान्य मतदारांमधून व्यक्त होत आहे..निवडणूक आयोग कारवाई करणार का?उमेदवारांच्या या ‘दबंग’ वृत्तीमुळे प्रशासकीय यंत्रणाही काही काळ हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आता या प्रकरणावर नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे:

“निवडणूक आयोगाच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या अशा उमेदवारांवर प्रशासन कठोर कारवाई करणार का? की दादागिरीच्या जोरावर हे उमेदवार लोकशाहीला ओलीस धरणार?”

निवडणूक नियमावलीनुसार, बोगस मतदान किंवा निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्यास उमेदवाराचे पद रद्द होऊ शकते किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे २१ तारखेच्या निकालाआधी किंवा निकालानंतर निवडणूक आयोग या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेते का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here