
शुक्रवारचा मुर्तिजापुरचा बाजार असल्यामुळे रोडने लोकांची गचबच गर्दी असतांनी अनिल मधुकर थोप रा. खरब ढोरे या सदगुणी व्यक्तीला डी पी रोडने जात असतांनी अवनी आकाश कांबळे वय अदाजे 4 वर्ष रा. कंझरा ही मुलगी रडत असतानी दिसुन आली, त्यांनी तिला विचारण्याचा प्रयत्न केला असता ति घाबरलेली असल्यामुळे काही सांगु शकत नव्हती म्हणून त्यांनी तीला शहर पोलीस स्टेशन येथे आणुन पोलीसाच्या सुफुर्द केले ,ती मुलगी आपल्या आई वडीलांचे नाव पत्ता सांगु शकत नव्हती त्यामुळे व फक्त रडतच होती परंतु ड्युटीवर असणारे महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या ममतेच्या वागणुकीने व तीला खाऊ देऊन तिला बाहेर फिरायला नेऊन शांत केले , व होमगार्ड सैनिक गजानन चव्हाण यांनी या मुलीचा फोटो त्यांच्या जवळ असलेल्या सर्व वाट्सअप ग्रुपवर फोटो टाकुन कोणाच्या ओळखीची असल्यास मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन येथे ड्युटीवर असणारे महीला पोलीस कर्मचारी शालीनी चव्हाण , होमगार्ड सैनिक गजानन चव्हाण यांच्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले होते याच माध्यमातून अवघ्या विस ते तिस मिनीटांनात मुलीचा शोध घेत असलेल्या वडीलाला कोणी तरी सांगितले की तुमची मुलगी शहर पोलीस स्टेशनला आहे मुलीचे आईवडील पोलीस स्टेशन ला आले, त्यांना विचारले असता की तुमची मुलगी कशी काय तुमच्या पासुन दुर गेली,मुलीच्या वडिलांनी सांगीतले की मी मुलीच्या आईला सरकारी दवाखान्यात चेकअपसाठी आणले होते परंतू मूलगी खेळत,खेळत बाहेर गेली कळालेच नाही, शोध घेत असतांनी लोकांनी आम्हाला सांगितले की तुमची मुलगी मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन ला आहे, त्यांची योग्य चौकशी करुन मुलगी आई वडीलाच्या स्वाधीन करण्यात आली आपल्या आई वडीलांना भेटुन दोघांचा आनंद द्वीगुणीत होऊन गगनात मावनेसा झाला होता, या मध्ये मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन चे डि. बि पथकाचे HC मुन्नाभाई पांडे ,LPC शालीनी चव्हाण,निशा लांडोरे, करिश्मा फरकाडे,होमगार्ड सैनिक गजानन चव्हाण यांनी,महत्वाची भुमिका बजावली.खर तर आज सोशल मिडीयाच्या सहाय्याने मुलीचे आई वडील शोधण्यास खूप मदत झाली अशा प्रकारे अवघ्या 20 ते 30 मिनीटा मध्ये मुर्तिजापुर पोलिसांना चिमुकलीचे आईवडील शोधण्यास यश आले






