
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/ नरेश राऊत राळेगाव येथील नगरपंचायत चे घंटागाडी चालक किरण भानखेडे यांचा प्रभाग क्रमांक ८ च्या नागरिकाकडून नगरसेवक माजी बांधकाम सभापती मंगेश राऊत यांच्या कल्पनेतून भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले प्रभाग क्रमांक आठ च्या खुल्या प्रांगणात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सत्कारमूर्ती किरण भानखेडे हा प्रभाग क्रमांक आठ माता नगर येथे नियमित सकाळी सात वाजता पासून परिसरातील घनकचरा गोळा करण्याकरिता चालक म्हणून आपली सेवा अविरत देत आहे त्याच्या सेवेत कुठलाही खंड पडत नाही यादरम्यान त्यांच्या अविरतसेवेतून नागरिकांची त्याने मने जिंकली आहेत त्याच्या या निष्काम सेवेबद्दल त्यांचा नागरी सत्कार घडून आणला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सरपंच कृष्णरावजी राऊळकर होते तर माजी तहसीलदार मधुकरराव गेडाम बापू फाउंडेशनचे अध्यक्ष रमेशराव माकोडे माजी प्राचार्य अशोकराव पिंपरे ज्येष्ठ नागरिक दमडूजी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती किरण भानखेडे यांच्या कार्याची दखल नगरसेवक मंगेश राऊत यांनी घेतल्याबद्दल त्यांचीही या ठिकाणी कौतुक करण्यात आले याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना किरण भानखेडे म्हणाला की आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांची आपण सर्वांनी दखल घेतल्याबद्दल मन भरून आले आहे सामान्य कर्मचाऱ्याचा जेव्हा नागरिकाकडून सत्कार होतो तेव्हा अधिक कार्य करण्याची उमेद प्राप्त होते याप्रसंगी उपस्थित त्यांनी आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमास प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी सर्वश्री. गजाननराव घुंगरूड सर, सुरेंद्रजी ताटे, माणिकराव भोंगाडे, कवडूजी येपारी, वाल्मीकराव मेश्राम, भगवानरावजी धनरे, नंदूभाऊ नालमवार, ढुमणे सर, अरविंदराव तामगाडगे,अशोकराव काचोळे, अजयभाऊ वैद्य, सय्यद लियाकतभाई, मनोज पेंदोर, प्रफुल खसाळे,दिनेश करमणकर,श्रीकांत कोदाणे, यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता श्री नितीनभाऊ कोमेरवार, प्रदीपभाऊ महल्ले, संजयभाऊ दुरबुडे, रुपेशभाऊ कोठारे, योगेशभाऊ इंगोले या सर्वांनी कार्यक्रमाची नियोजन केले. कार्यक्रमाचे संचालन मंगेश राऊत नगरसेवक माता नगर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्रावणसिंग वडते यांनी मान्यवरांचे व नागरिकांचे आभार मानले.









