
प्रतिनिधीपवन जाधवदारव्हा तालुक्यातील गौहुळपेंड येथील रहिवासी तथा संपूर्ण महाराष्ट्रात झुंजार व तडफदार सामाजिक नेतृत्व म्हणून अल्पावधीतच परिचित झालेले वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मेटांगे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय “महाराष्ट्र समाज रत्न सेवा पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला.सामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेले प्रमोद मेटांगे हे महामानव व क्रांतिकारकांच्या जयंती-पुण्यतिथींचे आयोजन, गोरगरीब नागरिकांच्या वैद्यकीय मदतीसाठी पुढाकार, तसेच विविध सामाजिक प्रश्नांवर प्रभावी कार्य करत आहेत. सर्व जाती-धर्मातील समाजबांधवांना एकत्र बांधून त्यांनी समाजसेवेचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील जनसामान्य नागरिक त्यांना आपुलकीने “भाऊ” म्हणून संबोधतात.हा पुरस्कार शासनमान्य सामाजिक संस्था शिव प्रतिष्ठान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थक्षेत्र आळंदी (पुणे) येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. कार्यक्रमास शिक्षणसम्राट मा. श्री रामकिशनजी खंदळे, शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री मदनजी रेनगडे पाटील तसेच राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित मा. श्री रामचंद्र आवटे यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमोद मेटांगे यांना शाल, श्रीफळ, मॅडल स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या सत्कार समारंभास वीर बापू बिरू वाटेगावकर सेवाभावी संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव हिरवे पाटील व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.या राज्यस्तरीय सन्मानामुळे दारव्हा तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरातून प्रमोद मेटांगे यांचे अभिनंदन होत आहे








