
ज्वालादीप न्यूज नेटवर्क कार्यकारी संपादक विलास सावळे
अमरावती:महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रभाग क्रमांक ६ (विलास नगर-मोरबाग-गवळीपुरा) मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या प्रभागातून ‘ओपन पुरुष’ प्रवर्गातून सुनील रामभाऊ करडे यांच्या नावाची सध्या नागरिकांमध्ये मोठी चर्चा असून, त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना प्रभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रशासकीय अनुभव आणि दांडगा जनसंपर्क
सुनील करडे यांनी २०१७ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत महापालिकेत अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. अडीच वर्षे महापौर सचिव आणि अडीच वर्षे उपमहापौर सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. या अनुभवामुळे महापालिकेच्या कामकाजाची त्यांना खडान् खडा माहिती असून, प्रशासकीय स्तरावर प्रलंबित कामे कशी मार्गी लावायची, याचे कसब त्यांच्याकडे आहे. विलास नगर ते गवळीपुरा अशा संपूर्ण प्रभागातील जनतेशी त्यांचा थेट आणि जिव्हाळ्याचा संपर्क आहे.

गरिबांचे ‘घरकुल’ स्वप्न केले साकारसुनील करडे यांची ओळख सध्या प्रभागात ‘हक्काचा माणूस’ म्हणून होत आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात सामान्य नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण कामे केली आहेत: प्रधानमंत्री आवास योजना: पाठपुरावा करून सुमारे १०० गरजू कुटुंबांना हक्काचे घरकुल मिळवून दिले. रमाई आवास योजना: या योजनेच्या माध्यमातूनही अनेक कुटुंबांच्या घराचा प्रश्न मार्गी लावला. ई-श्रम कार्ड: विशेष शिबिरांचे आयोजन करून शेकडो कामगारांची नोंदणी केली आणि त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला.

व्यावसायिक प्रतिष्ठा आणि सामाजिक चेहरा

सोम्याश्री कन्स्ट्रक्शन’चे संचालक म्हणून त्यांनी आपली व्यावसायिक ओळख निर्माण केली असली, तरी जनसेवा हाच त्यांचा मुख्य ध्यास राहिला आहे. प्रभागातील रस्ते, नाल्यांचे प्रश्न असोत किंवा वैयक्तिक समस्या, सुनील करडे नेहमीच मदतीला धावून जातात, अशी भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत.प्रभाग क्रमांक ६ मध्ये यंदा ‘ओपन पुरुष’ गटामध्ये अनेक दिग्गज इच्छुक असले, तरी सुनील करडे यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे सध्या त्यांचे नाव आघाडीवर आहे.

जाहिरातीसाठी व बातम्या करिता संपर्क कार्यकारी संपादक विलास सावळे मो. 7218335769







