वर्धा भु-माफीया ने नाला पण गिळला

0
43
ज्वालादीप प्रतिनिधी वर्धा  

वर्धेत भु-माफीयाची दादागिरी आता शिगेला पोहचली आहे. सरकारी अधिका-यांच्या संगणमताने आता सांड पाण्याचा नाला सुध्दा गडप करण्याचा प्रकार सुरु झाला आहे.

वर्धेच्या नालवाडी परिसरातील मौजा दत्तपुर येथील स.न. ८/२ आराजी ०.८१ हे.आर. मध्ये नविन लेआऊटचे काम नियम बाह्य सुरु आहे, सदर जागेच्या मधून गाव नकाशा प्रमाणे एक सांड पाण्याचा नाला वाहत होता. परंतु नगर रचनाकार यांच्या आर्शीवादाने भु-माफीया ने नाल्याची दिशाच बदलून टाकली आहे.

याचे दुष्परिणाम येत्या पावसाळ्यात पाण्याच्या निसर्गावर होईल व वर्धा-नागपूर रोडवर पावसाळ्याचे पाणी येईल व रोडची वाहतूक बंद होण्याची भिती वाढली आहे.सदर नाला कोणत्या नियमाअंतर्गत वळण्यात आला हे नगर रचनाकाराने स्पष्ट करावे. कारण नगर रचनाकार महोदया ने प्राथमिक मंजूर दिलेली आहे. प्रकरण अंतीम मंजूरी करिता प्रस्तावित आहे. सरकारी नियमानुसार नाल्याची दिशा बदलविण्याचा अधिकार भु-माफीयाला कोणी दिला. सदर लेआऊट धारकाने अधिका-यांचे खिसे किती गरम केले आहे.

वरील भुमी ग्रीन झोन मध्ये होती. त्याचे झोन बदलविण्यासाठी १९९८ मध्ये भुमी धारकाने अर्ज दिला होता. त्याअनुषंगाने तहसीलदाराने नगर रचनाकार यास पत्र लिहिले होते. परंतु त्यावेळच्या नगर रचनाकाराने, झोन बदलविण्याची विनंती नामजुर केली होती. त्यानंतर झोन केव्हा बदलले हे आताच्या नगर रचनाकाराने खुलासा करावे, जर झोन न बदलता प्राथमीक मंजूर दिली आहे तर प्रशासनाने रचनाकार यांच्या सरकारी नियमांच्या उल्लंघनावरुन त्यांच्यावर एफ.आय.आर दाखल करण्याची मागणी जनते कडून होत आहे.

वरील भुखंडाचे भु-माफीयाने प्लॉट पाडून ईसार व टोकन सुध्दा घेणे सुरु केले आहे. जे महा रेराच्या नियमांचे उल्लंघन आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here