भद्रावती तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात

0
17

साजराभद्रावती तालुका प्रतिनिधी / सुनिल दैदावार

भद्रावती : तहसील कार्यालय येथे राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपजिल्हाधिकारी तसेच तहसिलदार भद्रावती बालाजी कदम उपस्थित होते. ग्राहक चळवळीचे महत्त्व आणि ग्राहक हक्कांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार मधुकर काळे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे भद्रावती तालुका अध्यक्ष बालाजी दांडेकर, पुरूषोत्तम मत्ते, गोपाल घुमे, वामनराव नामपल्लीवार, वसंत वऱ्हाटे, प्रसिद्धी प्रमुख अतुल कोल्हे, तसेच ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे भद्रावती तालुका अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, सचिव वतन लोणे उपस्थित होते. यावेळी ग्राहकतीर्थ तसेच ग्राहक चळवळीचे जनक बिंदुमाधव जोशी आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहकांचे मूलभूत अधिकार, तक्रार निवारण प्रक्रिया तसेच ग्राहकांनी फसवणुकीपासून कसे सावध राहावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून जागरूक ग्राहकच सुदृढ समाज निर्माण करू शकतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. ग्राहकांनी खरेदी करताना बिल घेणे, गुणवत्तेबाबत सजग राहणे आणि अन्याय झाल्यास कायदेशीर मार्ग अवलंबणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी हर्षा दुधे यांनी केले, तर कनिष्ठ लिपीक रती मस्के यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here