राज्य बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याचा दबदबा; चार सुवर्णपदकांसह राष्ट्रीय पातळीवर झेप

0
17

भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे दिनांक २२ ते २७ डिसेंबर २०२५ दरम्यान पार पडलेल्या वरिष्ठ पुरुष महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील बॉक्सर्सनी घणाघाती कामगिरी करत चार सुवर्णपदके पटकावत अकोल्याचा दबदबा सिद्ध केला आहे.या सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना ग्रेट नोएडा (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली असून, अकोला जिल्ह्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण ठरला आहे.वरिष्ठ पुरुष गटात५५ ते ६० किलो वजनगटात हरिवंश टावरी,६५ ते ७० किलो वजनगटात मोहम्मद राहील सिद्दीकी,८० ते ८५ किलो वजनगटात कृष्णा लोखंडे,९०+ किलो वजनगटात शुभम चौधरीयांनी प्रतिस्पर्थ्यांना नामोहरम करत सुवर्णपदकांवर मोहोर उमटवली.या ऐतिहासिक यशाबद्दल खदान पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) केशव देवकर, भावी नगरसेवक आशीष पाडे तसेच पोलिस बॉय असोसिएशन, अकोला जिल्हा यांच्या वतीने खेळाडूंचा जाहीर सत्कार व अभिनंदन करण्यात आले.यावेळी विजय नवकार, नरेश राऊत, सचिन हातोलकर, विजय खंडारे, कुणाल सावडेकर, लखन इंगळे, रोशन सोनवणे, मुन्ना वरगट, इम्रान खान पठाण आदी मान्यवरांकडून खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.या घवघवीत यशामुळे अकोला जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाली असून, येत्या काळात अकोल्याचे खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here