शहापूर रुपागड येथील इसमावर वाघाचा हल्ला

0
24

वनविभागाचे पथक दाखल आठ दिवसात तिसरी घटना अकोटः अभिजित सोळंके उमरा, जीतापूर, शहानुर, खैरखेड, पोपटखेड या पहाडी भागातील सर्वच गावात गेल्या दोन ते तीन महिन्यापासून वारंवार बिबट, पट्टेदार वाघ या हिंसक प्राण्यांनी दहशत निर्माण केली आहे. शुक्रवारी शहानुर मधील मोठ्या गाईवर वाघाने हल्ला केला. गावकऱ्यांनी आरडा ओरड करून पहाडामध्ये हाकलले पुन्हा तोच वाघ काल शनिवारी भरदुपारी डुकरावर हल्ला करताना नागरिकांनी पाहिला. शहापूर रूपा गट जिल्हा परिषद शाळेच्या मागील भागात शेतकऱ्यांना दिसून आला. गाय बकऱ्या बैल म्हैस व रानडुक्कर व आज रविवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान आदिवासी शेतमजूर हुसेनमैताब ४८, त्यांचा मोठा मुलगा नैतिक व लहान मुलगा विटू हे तिघेजणे शेतात गव्हाला शेतात पाणी देण्याकरता गेले असता यांच्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये शेजारी आदिवासी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आरडा ओरडा व करत वाघाने पळ काढला.जखमीला आकोट ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक औषधे उच्चार करून अकोला रेफरकेले यावेळी या आदिवासी मैताब हुसेन यांच्यावर हल्ल्याची होण्याची माहिती पांडुरंग तायडे, सुभाष सुरत्ने, सरपंच पती विनायक सुरत्ने, यांनी तात्काळ माहिती देऊन देऊन वन विभागाला पाचारण केले.शहापूर रूपागड येथे वनपरिक्षेत्र अधिकारी कहाळे, साबळे, तायडे, डिगर, वनरक्षक मजूर सह नंदेश्वर यांनी ताफ्यासह धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. वाघाच्या हल्ल्याच्या संदर्भात सरपंच राम मंगळे यांनी वन विभागाला तक्रार सुद्धा दाखल केली आहे यावेळी अवि भारसाकडे, बाबाराव सुरत्ने, निलेश सुरत्ने, सुनील सुरतने, प्रमोद सुरत्ने, गजानन तराळे, प्रमोद भारसाकडे, पटवारी राजेश खामकर, उपसरपंच राजेश सोलकर तसेच आदिवासी नागरिक व महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here