
सेलडोह (प्रतिनिधी):अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, मोजरी शाखा सेलडोहच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५७ व्या पुण्यतिथीनिमित्त (मौन श्रद्धान्जली) भव्य दिंडी सोहळा आणि महाप्रसादाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सेलडोहसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रसंतांच्या विचारांना उजाळा दिला.भजन मंडळांचा निनादया पुण्यतिथी महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे विविध गावांमधून आलेली भजन मंडळे होती. यामध्ये सावंगी असोला, बोरगाव हिवरा, महाबळा, सावळी बिबी, बोरगाव मेघे, वडगाव जंगली, वायगाव निपाणी आणि वर्धा येथील नामवंत भजन मंडळांनी आपली कला सादर केली. खंजिरीच्या तालावर आणि गुरुदेवांच्या भजनांनी संपूर्ण सेलडोह परिसर भक्तीमय झाला होता.विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभागगावातून काढण्यात आलेल्या भव्य दिंडीमध्ये वारकरी संप्रदायाचा शिस्तबद्ध सहभाग पाहायला मिळाला. या सोहळ्यात आणि त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा लाभ इंदिरा हायस्कूल, यशवंत हायस्कूल आणि जिल्हा परिषद शाळा सेलडोह येथील विद्यार्थी व शिक्षक वृंद तसेच समस्त ग्रामस्थांनी घेतला.कार्यक्रमाची यशस्वीताहा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. यामध्ये प्रामुख्याने: नरेंद्र तिवारी, नामदेव बावणे, प्रफुल सोनटक्के, शंकर सोनटक्के शंकर राऊत, ओंकार आवते, अथर्व सोनटक्के, चेतन ठाकूर शांताराम बावणे, गोविंदा घुमे, ईश्वर बोरले, रितिक पारखेडकर यांसह अनेक गुरुदेव भक्तांनी मोलाचे योगदान दिले.राष्ट्रसंतांच्या “ग्रामगीता” विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकोपा वाढवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल परिसरात कौतुक होत आहे.






