श्री वेताळ बाबा यात्रा महोत्सवाला प्रारंभ श्रीमद भगवत कथा सप्ताहाचे आयोजन

0
19

अकोट:- अभिजित सोळंके: वेताळ बाबा नवसाला पावणारे अकोट तालुक्यातील धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेले वेताळ बाबा चे ठिकाण नावारूपाला आहे. सालाबाद प्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य पाच आठवड्यामध्ये यात्रा भरते तेव्हा महाराष्ट्रामधून भक्तगण यात्रेला हजर होतात स्व. नारायण खंडार यांच्या वडिलांपासून वेताळ बाबा चे ठिकाण स्थानापत्र आहेअनेकांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात. वेताळबाबा हा भक्तांच्या हाकेला धावणारा आहे. वेताळ बाबाच्या पंचक्रोशी मधील वस्तुस्थितीचे अनेक उदाहरणे आहेत जेव्हा एखाद्या व्यक्तीलाचकवा पडायचा तेव्हा नातेवाईक दिवस रात्र हरवलेला व्यक्तीला पाहायचे. पण तो व्यक्ती वेताळबाचाच्या मंदिरात दिसायचा, जनतेची श्रद्धा वेताळबाबावर आहे पाटसुल गावच्या पंचक्रोशी मधील नागरिकांचं ते दैवतच बनलेले आहेत खंडार परिवार व पंचक्रोशीतील गावकऱ्यांच्या सहकार्याने भव्य दिव्य यात्रा आज रोजी ही अस्तित्वात आहे. सालाबाद प्रमाणे पौष महिन्यातीलप्रत्येक रविवारी ही यात्रा संपन्न होते. सालाबाद प्रमाणे पार पडणाऱ्या यात्रेच्या कार्यक्रमांमध्ये पाटसुल रेल्वेच्या पंचक्रोशी मधील ह भ प मंडळे यांची उपस्थिती राहते. या भाविक भक्तांच्या यात्रेमध्ये अनेक भाविकभक्त मोठ्या भक्तीने भावाने आपली हजेरी लावतात. तसेच ४१ वर्षाची अखंडपरंपरा ह-भ-प वे.शा. सुरेश जोशी महाराज देवरीकर श्रीमद् भागवत संगीतमय कथा सप्ताह हा अखंडपणे चालू आहे. सुरेश जोशी महाराज त्यांचा मुलगा रामचरित्र कथा वाचक असून ह भ प श्रीकांत महाराज जोशी देवरीकर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वेताळ बाबांच्या सेवेची परंपरा चालवत आहेत. त्यांच्यासोबत संगीत विशारद झालेले व त्यांचा संच सालाबाद प्रमाणे रामचरित्र कथा होणारे वाचनामध्ये गायनाचार्य म्हणून जोशी महाराज यांना संगीताची साथ देतो तर रामचरित्र कथा वाचक त्यांचा लाडका मुलगा श्रीकांत महाराज कथा वाचनाचे कार्य करतात. आणि हभप मोहन म. मेतकर जैन पुरकर, यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आहे. सालाबाद प्रमाणे ठरलेली यात्रा २१ डिसेंबर रोजी सुरुवात झाली असून यात्रेच्या पाचव्या रविवारी दि. ७जानेवारी २०२६ रोजी मंदिराच्या वतीने महाप्रसादाचे सुद्धा आयोजन केले असून पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी अखंड श्रीमद् भागवत कथेचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजन समितीकडून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here