स्थानिक गुन्हे शाखेने कृषी नगर भागात छापा टाकून ५४ हजारांचा प्रतिबंधित ‘चायना मांजा’ जप्त; दोघांना बेड्या..!

0
19

ज्वालादीप अकोला प्रतिनिधी मनीष राऊत : मा श्री. अर्चित चांडक, पोलीस अधीक्षक, अकोला यांनी दिलेल्या निर्देशा नुसार ऑपरेशन प्रहार अंतर्गत जिल्हयात मानवी जीवनासाठी आणि मुक्या पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या प्रतिबंधित ‘नायलॉन मांजा’ (चायना मांजा) विरोधात अकोला पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कृषी नगर अकोला, भागात छापा टाकून दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून एकूण ५४ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.अकोला येथील कृषी नगर परिसरात एका किराणा दुकानातून बंदी असलेल्या नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.या माहितीची खातरजमा करून पोलीस पथकाने सापळा रचला आणि पंचांच्या उपस्थितीत सदर दुकानाची झडती घेतली. यावेळी दुकानात लपवून ठेवलेला ‘चायना मांजा’ मोठ्या प्रमाणात मिळून आला. आरोपींची नामे १) गोपाल रामदास लाहे (वय ३० वर्षे, रा. भीम नगर, अकोला) २) मनिष बाबाराव खाडे (वय २५ वर्षे, रा. भीम नगर, अकोला), पोलिसांनी दरम्यान खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे: MONO KTC कंपनीचे ५१ बंडल (किंमत ५१,००० रु.) MONO KTC FIGHTER कंपनीचे ३ बंडल (किंमत ३,००० रु.), एकूण किंमतः ५४,००० रुपये. या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११०, २२३, ३(५) आणि पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ४ व १५ नुसार सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.चायनिज मांजा शहरामध्ये पंतग उडविण्याकरीता वापरल्यामूळे दुचाकी चालक, पादचारी तसेच पशु पक्षी इत्यांदींचा जिव जाण्या इतपत गंभिर दुखापती होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे प्रतिबंधीत नायलॉन मांजा विक्रेते अपणास आढळून आल्यास त्यांचेबाबत माहीती देण्यास अकोला जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक मा. बी. चंद्रकांत रेड्डी मा.श्री. शंकर शेळके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पो उपनि विष्णू बोडखे, ग्रेड पो उपनी ठाकरे पोहेकॉ किशोर सोनोने वसीमोद्दीन महेंद्र मलिये एजाज अहमद पोका अशोक सोनवणे मपोहेका स्वप्ना, स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here