
अकोला मनीष राऊत : गुन्हयाची थोडक्यात हकीकत हकीकत अशा प्रकारे आहे की, पोलीस स्टेशन सिव्हीललाईन, अकोला येथे आज दिनांक ०२/०१/२६ रोजी ०८.०० वाजताचे सुमारास सुरज रामराव भगेवार रा. संजय नगर, मोठी उमरी मोबाईल क्रमांक ९९२२३८३८७८ वरून डायल ११२ ला कॉल केला की संजय नगर मोठी उमरी येथे अमोल डिगांबर पवार वय ३५ वर्षे यांचा मर्डर झालेला आहे वरून बिट मार्शल वरील कर्मचारी यांनी पोलीस स्टेशनचे तपास पथकातील कर्मचारी व बिट कर्मचारी यांना माहीती दिली. पोस्टे चे तपास पथक व बिट अंमलदार यांनी तत्परता दाखवित घटनास्थळी खाना होवुन मृतक अमोल डिगांबर पवार यांचे घरी पोहचुन गुप्त बातमीदाराकडुन माहीती मीळाली की नितेश अरूण जंजाळ वय ३८ वर्षे व मृतक अमोल डिगांबर पवार दोन्ही रा. संजय नगर मोठी उमरी अकोला हे चांगले मीत्र असुन नेहमी सोबत राहतात त्यांच्यामध्ये काल दिनांक ०१/०१/२५ रोजी भांडण झालेले आहे अशा खात्रीलायक बातमीवरून आरोपी नितेश अरूण जंजाळ वय ३८ वर्षे रा. संजय नगर मोठी उमरी अकोला यांचे घरी जावुन पाहीले असता आरोपी तेथे नसल्याने गुप्त बातमीदार लावुन अर्ध्या तासाच्या आत आरोपी नितेश अरूण जंजाळ यास तातडीने ताब्यात घेवुन सदर गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन गुन्हा दाखल करण्यी प्रक्रीया सुरू आहे.सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अर्चित चांडक साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. रेडडी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील साहेब शहर विभाग अकोला यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक श्रीमती मालती कायटे पो.स्टे. सिव्हील लाईन अकोला यांचे आदेशानुसार १) पोहेकॉ आशिष खंडारे २) पोहकों संतोष बागळे ३) पोकों शक्ती कांबळे ४) पोकों प्रदिप पवार पोस्टे सिव्हील लाईन अकोलायांनी केली.







