
कळंब तालुका प्रतिनिधी,पवन जाधवडोंगरखर्डा :-अप्पर तहसीलदार मेटीखेडा येथे दिनांक 2जानेवारी 2026रोजी मेटीखेडा परिसरातील आशा व गटप्रवर्तक कडून निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर कोरोना विषयक (कोबीड 19) काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक या शासन निर्णयानुसार दरमहा रुपये 1000 प्रमाणे 22 महिनाचा प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायत कार्यालया तर्फे अदा करण्याकरीता पत्र काढण्या बाबत.जिल्हा परिषद मार्फतपत्र क्रमांक/यजिप/पंचा/आस्था-3/कवि/4038/2025 व्यवहार करण्यात आले असून, शासनाने कोविड-19 कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांना ग्रामपंचायती मार्फत दरमहा रुपये 1000/- प्रमाणे 22 महिने कोविड कालावधीत प्रोत्साहन भत्ता देणे शासन परीपत्रानुसार आदेशीत होते व महाराष्ट्रातील सर्वच जिल्हात त्याची अंमलबजावणी झाली आहे. परंतु आपल्या यवतमाळ जिल्यात भक्त एक महिना 1000-रुपये प्रोत्साहन भत्ता प्रामपंचायत मार्फत दिला आहे. उर्वरीत 21 महिण्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही. सदर रक्कम मिळाला पाहिजे होती. परंतु जिल्हातील ग्रामपंचायतीनी सदर रक्कम अदा केलेली नाही. तरी 21 महिण्याची रुपये 21000 /- हजार थकबाकी रक्कम अदा करण्याचे आदेश आपल्या मार्फत काढण्यात यावे. ग्रामपंचायत कर्मचारी यांना 22 महिण्याचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा म्हणुन आपण आदेश काढले आहे. त्याचप्रमाणणे आशा व गटप्रवर्तक याना प्रोत्साहन भत्ता मिळावा, याकरीता आदेश पत्र काढुन न्याय द्यावा, अशी आम्ही सर्व आशा CITU संघटनेच्या वतीने मागणी करीत अप्पर तहसीलदार कार्यालय मेटीखेडा येथे निवेदन देण्यात आले यावेळी संपूर्ण आशा व गटप्रवर्तक उपस्थित होत्या.








