
राळेगाव शहर प्रतिनिधी / बंडु भारसकरे राळेगाव तालुक्यातील देवधरी येथील, दिनांक, 3/1/2026 रोजी जि, प, उच्च प्राथमिक शाळेत बाल आनंद महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,बंडू भारसकरे यांनी सावित्रीबाई फुले यांचे फोटोचे पूजन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री अमोल सरोदे सर यांनी केले, आणि आभार प्रदर्शन,श्री अंकुश काकड सर कार्यक्रमाच्या यशस्वी साठी श्री विनोद शेडमाके, मनीषा शेडमाके व पालक मंडळींनी सहकार्य केले, सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करून माल्यापर्ण करण्यात आले, याप्रसंगी शिक्षणाच्या पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने रोपटे चिमुकल्यांच्या मनात रुजावे याकरिता मान्यवरांनी सावित्रीबाईचे सावित्रीबाईचे शिक्षण विषयी असलेले विचार व त्यांची थोरवी विद्यार्थ्यासमोर प्रस्तुत केली या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले च्या शिक्षक वृत्तीचे वर्णन व स्त्री शिक्षणाची महती समाज मनात रुजवताना झालेला त्रास समाजा विरुद्धच्या लढ्यात त्या कशा यशस्वी झाल्या यांचे वर्णन, मुख्याध्यापक श्री अमोल सरोदे सर यांनी आपल्या भाषणातून सादर केले, सोबतच अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाईची सुंदर अशी वेशभूषा साकारली, आनंद मेळावा साजरा करताना शाळेमध्ये विद्यार्थिनी स्व कर्तुत्वावर उभे व्हावे यासाठी आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यावसायिक स्टॉल उभारून प्रत्येकाने वेगवेगळे पदार्थ स्टॉलवर ठेवून त्यांची विक्री केली यावेळी शाळेच्या विद्यार्थिनी विविध प्रकारच्या रांगोळी काढून आपल्या कलेचे प्रदर्शन केले विविध प्रकारच्या स्टॉलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसायिक शिक्षणाबद्दल शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक श्री अमोल सरोदे सर अंकुश काकड सर, यांनी मार्गदर्शन केले, अशा रीतीने आनंद महोत्सव कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे मोठ्या उत्साहाने पार पडला, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री अमोल सरोदे सर यांनी केले, आनंद उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या शिक्षक अंकुश काकड सर यांनी विशेष परिश्रम घेतले व बाल आनंद मेळावा यशस्वीरित्या आनंदमय वातावरणात पार पडला या उच्च प्राथमिक शाळेने वेळोवेळी सांस्कृतिक व इतर कार्यक्रमात सहयोग व कार्यक्रम केला व विद्यार्थी घडविण्यात जे यशस्वी प्रयत्न केले याबद्दल या शाळेचे व शाळेचे शिक्षकांचे सर्वत्र देवधरी गावातून व परिसरातून कौतुक होत आहे तसेच विशेष करून या चिमुकल्यांचे उच्च प्राथमिक शाळेचे कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल बाल आनंद महोत्सव मेळाव्याचे देवधरी गावात सर्वत्र कौतुक होत आहे हे विशेष, उपस्थित गावकरी तसेच शाळा व्यवस्थापन समिती महादेव टेकाम, दशरथ घोटेकर, बंडू मोहितकर, रमेश डहाळकर, मारुती भोयर, उषाताई ढुमणे, मनीषा भारसकरे, आकाश घोटेकर, मनीषा शेडमाके, प्रवीण कुबडे, विनोद शेडमाके, बंडू भारसकरे, यांच्या उपस्थितीमुळे बाल आनंद मेळावा पार पडला.







