
८,०६०/- रू. चा मुद्देमाल केला जप्त* *अकोट :- अभिजित सोळंके*अकोट शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध शाखेचे अंमलदार नववर्षाच्या पुर्वसंध्येला पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहिती मिळाली त्या माहीतीवरून वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून प्रोव्हीशनच्या चार कार्यवाही करून आरोपी (१) दिनकर काशिराम शेगोकार वय १८ वर्षे रा. चोहट्टा बाजार (२) संग्राम बाबुराव तेलगोटे वय ३५ वर्षे रा.आंबोळी वेस अकोट (३) आकाश तुळशिराम धांडे वय २५ वर्षे रा. अमोना ता. अकोट (४) विठ्ठल प्रल्हाद अंभोरे रा. अन्नाभाऊ साठे नगर अकोट यांचेकडुन एकुन ८.०६०/- रूपयाची देशि विदेशी दारू दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आलीआहे. ही कार्यवाही अकोला जिल्हा पोलिस अधिक्षक अर्जित चांडक, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत रेडडी, सहायक पोलिस अधिक्षक निखील पाटील उपविभागिय पोलिस अधिकारी अकोट, पो निरक्षक अमोलमाळवे, याचे मार्गदर्शनाखाली पोउपनि वैभव तायडे, सहायक पोउपनि हीमंत दंदी, पोहेकों नरेंद्र जाधव, पोकों कपिल राठोड, पोकों नितेश सोळंके, पोकों सुबोध खंडारे यांनी केली.






