काँग्रेसमधील अंतर्गत कटकारस्थानामुळे अकोट नगराध्यक्ष निवडणुकीत पराभव सौ. अलका बोडखे यांचा आरोप

0
12

अकोट:- अभिजित सोळंके*अकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. अलका संजय बोडखे यांचा पराभव हा पक्षांतर्गत कटकारस्थानामुळे झाल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नगराध्यक्ष पदासाठी आपली अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर हिदायत पटेल यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. पक्षाने उमेदवारी कायम ठेवली असतानाही त्यांनी पाच ते सहा दिवस त्रास देत केवळ औपचारिक पाठिंबा दर्शविल्याचा आरोपसौ. बोडखे यांनी केला आहे. नगरसेवक पदाच्या एकूण ३५ उमेदवारांपैकी केवळ ७ जागांवरच पक्षनिष्ठ उमेदवार देण्यात आल्याचा आरोप करत आपल्या समाजाचे अकोट शहरात ७५०० पेक्षा अधिक मतदार असतानाही एकाही जागेवर प्रतिनिधित्व मिळू दिले नसल्याचे त्यांनी नमूद केले. उलट भाजपाने त्याच समाजातील नगराध्यक्ष पदासह पाच नगरसेवक उमेदवार दिल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान झाल्याचादावा करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व प्रहार संघटना काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार असतानाही हिदायत पटेल यांनी जाणीवपूर्वक आघाडी टाळल्याने २ ते ३ हजार मतांचे नुकसान झाल्याचेही निवेदनात नमूद आहे. तसेच प्रभाग क्रमांक १,२,३,६,७,९, मध्ये मुद्दाम कमकुवत उमेदवार देऊन काँग्रेसचा दारुण पराभव घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुस्लीम बहुल प्रभागांमध्ये काँग्रेसच्या १५ उमेदवारांनंतरही केवळ सुमारे ३ हजार मते मिळाल्याने हा ऐतिहासिक अपयश असल्याचे सांगत ही मते जाणीवपूर्वक एमआयएमकडे मागणीसाठी आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच सहकारउपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची अलका बोडखे यांची मागणीगटाच्या माध्यमातून भाजपाला अप्रत्यक्ष मदत करून त्यांच्या मतांमध्ये वाढ केल्याचा ठाम आरोपही करण्यात आला आहे. सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीतही हिदायत पटेल यांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवून पक्षविरोधी भूमिका घेतल्याची आठवण करून देत अशा कारवायांमुळे अनेक नेते पक्ष सोडून गेल्याचा दावा करण्यात आला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही काँग्रेसचे नुकसान होऊ नये म्हणून हिदायत पटेल यांना तात्काळ पक्षातून निलंबित करावे व काँग्रेस समर्थकांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी सौ. अलका बोडखे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय व प्रदेश नेतृत्वाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here