अकोट नगर परिषदेचा आनंदयात्री उपक्रम मुख्याधिकारी मा.शशिकांत बाबर यांची सकल्पना..

0
15

अकोट:- अभिजित सोळंके आकोट नगर परीषदेने नविन वर्षानिमित्त नविन संकल्प करीत शहरातील नागरिकांनी आपला आनंदाचा दिवस नगर परीषद शाळामधील विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यासाठी मुख्याधिकारी शशिकांत शांताबाई मारोती बाबर (मशप्रसे) यांच्या संकल्पनेतुन *आनंदयात्री* उपक्रमाची सुरवात केली आहे. आकोट नगर परीषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेविषयी रुची वाढावी यासाठी काही मुलांकडे शालेय साहित्याचा अभाव तसेच शाळांमध्ये भौतिक सोई सुविधांची कमतरता असते, ती दुर करण्यासाठी शहरातील नागरिकांनी त्यांचा आनंदाचा दिवस, आनंदाचे क्षण नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसोबत घालवावेत व विद्यार्थ्यांना भेटवस्तु देऊन आनंदयात्री बनावे. प्रस्तुत उपक्रमांतर्गत शहरातील नागरीक, दानशुर व्यक्ती, लोकप्रतिनिधी, सामाजीक संस्था इत्यादीनी त्यांचा आनंदाचा दिवस, जसे आपला व आपल्या प्रियजनांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस तत्सम आनंदाच्या दिवशी नगर परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांसोबत काही क्षण घालवावेत आणी शक्य त्या प्रकारे विद्यार्थांना भेटवस्तु देऊन आपला आनंद व्दिगुणीत करावा. भेटवस्तु मध्ये शाळेचा गणवेश सोडुन वही, पेन,अवांतर पुस्तके, चिञकलेचे साहित्य, स्कुल बॕग, पाणी बाॕटल, टिफीन किंवा शाळेसाठी वाॕटर फिल्टर, डिजिटल बोर्ड यापैकी एक किंवा अधिक वस्तु देता येईल या उपक्रमाअंतर्गत भेट वस्तु देणाऱ्या व्यक्तींना *”आनंदयाञी”* संबोधण्यात येईल व त्याची नोंद नगरपरिषद शिक्षण विभाग येथे पाहण्यासाठी उपलब्ध राहील व सदर यादी प्रत्येक महिन्या अखेर प्रसिध्द करण्यात येईल. या उपक्रमाचे *नोडल अधिकारी म्हणुन नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी सुनिल तरोळे* राहणार आहेत, सर्व शहरवासियांना सदर उपक्रमात सहभागी होण्याचे व आनंदयात्री बनण्याचे आवाहन नगर परीषदेच्या नगराध्यक्षा सौ.मायाताई विवेकराव धुळे व मुख्याधिकारी शशिकांत शांताबाई मारोती बाबर (मशप्रसे) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here