
कळंब ता. प्रतिनिधी पवन जाधवकळंब :-आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद शाळा मजरा येथे प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली. त्यानिमित्त शालेय विद्यार्थी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा वेश परिधान करून आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमान गराट भाऊ होते. तथा प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुनंदाताई जुनगरे व उपाध्यक्ष श्री. विनोद भाऊ बोडे होते. सर्व मान्यवरांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यावर आधारित भाषणे देण्यात आली. तसेच बालिका दिनानिमित्त माता पालकांची सभा घेण्यात आली. त्यामध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली. तसेच माता पालकांचा व शाळेतील विद्यार्थ्यांचा संगीत खुर्ची हा खेळ सुद्धा घेण्यात आला आणि विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सुनंदाताई जुनगरे उपाध्यक्ष श्री. विनोद भाऊ बोडे, प्रमिलाताई वाडेकर तथा संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका वर्षा लोणारे यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका शितलयेलेकार यांनी केले.कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या माता पालक उपस्थित होत्या तसेच सौ. ज्योती अंजीकर अंगणवाडी सेविका सरोज ताई काळे ,अंगणवाडी मदतनीस हौसाबाई कीनाके ,आशा वर्कर सौ. मंजुषाताई ठाकरे तसेच गावातील युवक मंडळातील सदस्य व इतर विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते.






