
अकोला मनीष राऊत | ४ जानेवारी २०२६अकोल्यातील झुल्फिकार अली मैदानावर आज एमआयएम (MIM) प्रमुख खासदार असदउद्दीन ओवेसी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी अकोला शहरासह जिल्हभरातून लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते. सभा संपल्यानंतर जमाव अनियंत्रित झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता, मात्र डाबकी रोड पोलिसांनी अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळत परिस्थिती नियंत्रणात आणली.लाखोंच्या गर्दीने मैदान ओसंडून वाहिलेसभेसाठी सकाळपासूनच समर्थकांचे जथे मैदानावर दाखल होत होते. सभेची वेळ होईपर्यंत लाखांहून अधिक कार्यकर्ते जमल्याने मैदानात पाय ठेवायलाही जागा उरली नव्हती. ओवेसींचे भाषण संपताच त्यांना जवळून पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्टेजच्या दिशेने एकच धाव घेतली, ज्यामुळे गोंधळ उडाला.डाबकी रोड पोलिसांची उल्लेखनीय कामगिरीअचानक निर्माण झालेली लाखांची गर्दी आणि गोंधळामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे होती. अशा कठीण प्रसंगी डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत संयमाने आणि तत्परतेने पावले उचलली. पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला आणि विखुरलेल्या जनसमुदायाला शिस्तबद्ध रितीने मैदानाबाहेर काढले. पोलिसांच्या या चोख नियोजनामुळे मोठा अनर्थ टळला असून, डाबकी रोड पोलिसांनी परिस्थिती अत्यंत चांगल्या प्रकारे नियंत्रित आणल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.ओवेसींची सुरक्षित पाठवणीगोंधळ वाढल्याचे लक्षात येताच पोलिसांनी कडेकोट सुरक्षा कचाट्यातून ओवेसींना सभास्थळावरून सुरक्षितपणे बाहेर काढले. लाखांच्या गर्दीतून त्यांना सुरक्षित रस्ता करून देण्यात पोलिसांना यश आले.नियोजनावर टीकादरम्यान, लाखोंची गर्दी जमणार असतानाही आयोजकांनी पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचे समोर आले आहे. सभेचे नियोजन पूर्णपणे फसल्याने आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने आयोजक व ओवेसी यांच्या ‘बेजबाबदारपणा’वर सर्वस्तरातून टीका केली जात आहे.







