लोतवाडा सरपंचपदी प्रीती गावंडे तर उपसरपंचपदी बंडूभाऊ मानकर यांची निवड; कुलदीप भाऊ काळे यांच्या उपस्थितीत जल्लोष

0
12

दर्यापूर (प्रतिनिधी):तालुक्यातील लोतवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणूक नुकतीच उत्साहात पार पडली. यामध्ये सरपंचपदी सौ. प्रिती मोहन गावंडे तर उपसरपंचपदी श्री. बंडुभाऊ मानकर यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत पार पडलेल्या या निवड प्रक्रियेनंतर विजयाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अमरावती ग्रामीण सरचिटणीस तथा संत लहानुजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. कुलदीप भाऊ काळे यांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या विशेष प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ मार्गदर्शक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “गावातील सर्वांना सोबत घेऊन आणि विश्वासात घेऊनच लोतवाड्याचा विकास साधला जाईल. रस्ते, पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांना आमचे प्राधान्य असेल,” असे प्रतिपादन नवनियुक्त सरपंच सौ. प्रिती गावंडे यांनी केले.श्री. कुलदीप भाऊ काळे यांनी नवनियुक्त मंडळाला मार्गदर्शन करताना सांगितले की, गावाच्या प्रगतीसाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य मिळवून दिले जाईल. निवडीनंतर ग्रामस्थांनी नवनियुक्त सरपंच व उपसरपंचांची गावातून मिरवणूक काढली. या निवडीबद्दल तालुक्यातील राजकीय व सामाजिक स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here