
राळेगाव तालुका प्रतिनिधी : हर्षल चौधरी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधींची निवड करण्याच्या प्रक्रियेत ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था, धानोरा शाखेच्या वतीने सुरेश कृष्णाजी भोयर (सर) यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करणाऱ्या धानोरा येथील ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेतून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी एका प्रतिनिधीची निवड करण्यात येते. यंदाच्या निवड प्रक्रियेत सर्व सदस्यांचा विश्वास संपादन करत सुरेश भोयर (सर) यांची बहुमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात सहकारी सोसायटीचे सचिव किशोर मोगरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रकाश घिनमीणे, सदस्य शामभाऊ येनोरकर, जितेंद्र कहुरके, अशोक ठाकरे, दशरथ येनोरकर, रमेश घोडे, सौ. प्रिती रामभाऊ भोयर आदी उपस्थित होते.तसेच या निवड प्रक्रियेला गावातील गोपालबाबु कहुरके, विजय येनोरकर, उपसरपंच विशाल येनोरकर, अशोक पाटील, बंडू लभाने, दशरथ कामडी, रामभाऊ भोयर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून सुरेश भोयर (सर) यांना शुभेच्छा दिल्या.सुरेश भोयर (सर) यांच्या निवडीमुळे सहकारी संस्था व शेतकरी वर्गाच्या हितासाठी अधिक प्रभावी कार्य होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.







