
ज्वालादीप कार्यकारी संपादक विलास सावळे
अमरावती ,अकोला जिल्ह्यातील विज्ञाननिष्ठ शिक्षकांनी श्री चक्रपाणि शेतकरी कृषी उद्योग समूह जांभा खुर्द तालुका मूर्तिजापुर यांच्या प्रक्षेत्रावर कृषी , वृक्षारोपण , जलसंधारण,विषयक माहिती करून घेतली. सोबतच डाळ प्रक्रिया उद्योगासंबंधीची माहिती उद्योग समूहाचे प्रमुख राजूभाऊ वानखडे यांनी करून दिली. या उद्योगाला पायाभूत ठरणारी डिश्टोनर, ग्रॅव्हिटी सेपरेटर, धान्यातील ओलावा कमी करण्यासंबंधीचे ड्रायर, याविषयीची सुद्धा सविस्तर माहिती उपस्थितानी करून घेतली.या कार्यक्रमाचे आयोजन निवत्त विज्ञान शिक्षक व या शेतकरी उद्योग समूहाचे संचालक हरिभाऊ वानखडे यांनी केले होते. . सर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक वलगाव येथीलविज्ञान शिक्षक जयकृष्ण जामनेकर यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यावली शहीद येथील विज्ञान शिक्षक परमेश्वर मरकाम यांनी अशा कार्यक्रमाच्या आयोजनाची महिती विशद केली.या कार्यक्रमाला पारडी, देवरा, येवदा, दर्यापूर, मूर्तिजापूर, कोळंबी, शेलुबाजार येथील विज्ञाननिष्ठ शिक्षकांनी हजेरी लावली. विशेष अतिथी म्हणून दर्यापूर येथील एड. रियाजभाई घाणीवाले, येवदा येथील गोपाल काटकर, प्रा. सुधाकर गौरखेडे उपस्थित होते.कार्यक्रमानंतर रोडगे ,भरीत, वांग्याची भाजी, वरण ,भात, चूरमा, जेवणाचा निसर्गाच्या सानिध्यात उपस्थितानी मनसोक्त आनंद लुटला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीकांत वानखडे, मुन्ना नाईकनवरे, चंदू वानखडे, सचिन गुल्हाने, राम गावंडे, बंटी उमाळे, गजानन कवळकर, राजेश जोशी,अमित गावंडे , सुधीर बोंडे यांनी मदत केली.






