POCSO गुन्ह्यात आरोपीला न्यायालयीन जामीन

0
9

मूर्तिजापूर : दि. १८/१२/२०२५ रोजी मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीने तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार शाळेत जात असताना आरोपीने तिचा पाठलाग करून हात पकडत विनयभंग केला तसेच फिर्यादीच्या भाऊ व वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मूर्तिजापूर पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली होती.हा गुन्हा POCSO अंतर्गत गंभीर व अजामीनपात्र स्वरूपाचा असल्याने आरोपीच्या वतीने मूर्तिजापूर येथील प्रसिद्ध व अनुभवी वकील अ‍ॅड. एम. एम. हुसेन यांची कायदेशीर मदत घेण्यात आली. सत्य परिस्थिती न्यायालयासमोर मांडण्यासाठी अ‍ॅड. हुसेन यांनी विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला येथे आरोपीचा जामीन अर्ज दाखल केला.या प्रकरणाची सुनावणी करताना विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. एम. एम. हुसेन यांनी सादर केलेले पुरावे व सखोल युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात न्यायालयीन प्रक्रियेनंतर जामीन मंजूर झाल्याने आरोपी व त्यांचे नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत असून, कायदेशीर बाजू प्रभावीपणे मांडल्याबद्दल परिसरात अ‍ॅड. एम. एम. हुसेन यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here