
ज्वालादीप न्यूज नेटवर्क मुर्तीजापुर स्वप्निल जामनिक
मूर्तिजापूर शहरात थेट घरात घुसून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची लूट करणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्या गॅंगचा मूर्तिजापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही तासांत आरोपींना अटक करून जेलबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.दिनांक **06/01/2026** रोजी मूर्तिजापूर स्टेशन हद्दीतील अकोला चक्की परिसरात राहणाऱ्या **लता सत्यनारायण भारुका (वय 68)** यांच्या गळ्यातील सुमारे **25 ग्रॅम वजनाची, अंदाजे साडेतीन लाख रुपये किमतीची सोन्याची चैन** आरोपी गॅंगने हिसकावून पलायन केले होते. या घटनेनंतर मूर्तिजापूर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपींचा माग काढला.
तपासादरम्यान असे उघड झाले की, सदर गॅंगने मूर्तिजापूरसह **अकोला, अचलपूर व इतर परिसरातही** अशाच प्रकारच्या घटना केल्या होत्या. आरोपी **MP 70 C 0581** क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून येत असून, वाहनाच्या मागील बाजूस **BJP चे चिन्ह** लावलेले होते. संशय टाळण्यासाठी आरोपी दूरच्या ठिकाणी चारचाकी उभी करून रिक्षाने शहरात प्रवेश करत, त्यानंतर शहरातूनच दोनचाकी वाहन चोरून चोरीच्या घटना घडवत असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी **मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे सापळा रचून** आरोपींचा पाठलाग केला. मूर्तिजापूर येथून लोणी टाकळी, उत्तम सरा, बडनेरा मार्गे पाठलाग करत अखेर **अमरावती येथील ‘वर्ल्ड ड्रीमलँड बार अँड रेस्टॉरंट’** येथून आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये**संजय ब्रिज मोहन चौकशी (वय 48, रा. तुल्लोखुर्द, इंदोर),अर्जुन बाबुलाल सोळंके (वय 30, रा. मरीमाता चौक, गणेश मंदिर परिसर, अकोला),दानिश खान दिलावर खान (वय 19, रा. इंदोर),संजय देविदास पाटील (वय 45, रा. इंदोर),दिनेश जमनालाल पवार (वय 45, रा. इंदोर)**यांचा समावेश आहे.ही कारवाई **अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक** यांच्या मार्गदर्शनाखाली **अरुण मेश्राम, सचिन दुबे, पांडे मेजर, गजानन खेडकर, चालक लोखंडे, दाबकी रोड API अंधारे, प्रवीण इंगळे, मुन्ना ठाकूर व दीपक तायडे** यांच्या संयुक्त पथकाने केली.
मूर्तिजापूर पोलिसांच्या या जलद व धाडसी कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, शहरात दहशत निर्माण करणाऱ्या चोरट्या गॅंगवर प्रभावी कारवाई झाल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.







