माकोडा कोलाम पोडाचा रस्त्यासाठी वनवास !

0
10

२ वर्षांपूर्वी मंजूर काम अद्याप कागदावरच समस्या सोडविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडेयवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / नरेश राऊत पांढरकवडा: तालुक्यातील मौजा मांगुर्डा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या माकोड़ा कोलाम पोड येथील आदिम जमातीच्या नागरिकांनी आजही गुलभूत सोयीयाती गोता संघर्ष करावा लागत आहे. सन २०२३-२४ मध्ये ‘ जन सुविधा योजने’तून मंजूर झालेल्या नवीन रस्त्याचे आणि नाल्यावरील पुलाचे काम दोन वर्षे उलटूनही सुरू न झाल्याने, संतप्त नागरिकांनी सोमवारी (ता.५) जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेऊन हे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे,मांगुर्डा ग्रामपंचायत अंतर्गत माकोडा कोलाम पोड वस्ती आहे. ही वस्ती अतिदुर्गम जंगल भागात बसलेली आहे. येथे स्वातंत्र्यापूवींपासून केवळ आदिम जमातीने (कोलाम समाज) लोक वास्तव्यास आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही या वस्तीला मुख्य प्रवाह मध्ये जोडणारा हक्काचा रस्तानाही. पाण्याची देखील व्यवस्था नाही, या मागण्यां बाबत ग्रामपंचायत मार्फत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. २० ते २५ वर्षांपासून रस्त्यासाठी मागणी करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासन मिळत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जातीने जिल्हाधिकारी यांनी समस्या सोडवावी अशी अपेक्षा येथील नागरिक व्यक्त करीत आहे. निवेदन देतांना भाऊराव टेकाम, माधव मेश्राम,कवडू आत्राम, गुलाब आत्राम, कृष्णा टेकाम, दादाराव टेकाम, चंपत आत्राम, सुरेश आत्राम, भीमा टेकाम आदींची उपस्थिती होती,ग्रामस्थांसह महिलांचे हालरस्त्याअभावी येथील नागरिकांना रहदारीसाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. विशेषतः रात्री-बेरात्री औषधोपचारासाठी बाहेर जायचे असल्यास किंवा गरोदर महिलांना रुग्णालयात न्यायचे असल्यास रस्ता आणि नाल्यावरील पुलाअभावी जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो,मंजूर काम रखडले कुठे?सन २०२३-२४ च्या अन सुविधा योजनेमार्फत या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदारांनी कामाच्या जागेची पाहणी देखील केली आहे. मात्र, पाहणी होऊन बराच काळ लोटला तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. है काम नेमके कोणाच्या दबावामुळे किंवा कोणत्या तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहे, असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here