
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :- नरेश राऊत मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन या पत्रकार दिनानिमित्त राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने साप्ताहिक आत्मबल कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला.या पत्रकार दिनाचे औचित्य साधून राळेगाव नगरपंचायतचे नगरसेवक तथा साप्ताहिक आत्मबल चे संपादक मंगेश राऊत यांनी साप्ताहिक आत्मबल कार्यालयात राळेगाव तालुका पत्रकार संघटनेतील सर्व सदस्यांचा शाल श्रीफळ व डायरी पेन देऊन सत्कार केलाकार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देण्यात आला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. आपल्या लेखणीच्या बळावर शोषित, वंचित घटकांच्या समस्यांना वाचा फोडणे, भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पाडून लोकशाहीला बळकट करण्याचे काम हे पत्रकार बांधव करीत असतात. राजकीय असो की सामाजिक कामांबाबत, जनसामान्यांचे समस्या आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन प्रशासनाच्या लक्षात आणून देण्याचे काम पत्रकार करीत असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. त्यानंतर राळेगाव तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले यावेळी राळेगाव तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मेहता, राजू रोहनकर, महेश शेंडे, फिरोज लाखांनी, राजेश काळे, अशोक पिंपरे, मंगेश राउत,मनीष काळे, प्रकाश खुडसंगे ,राष्ट्रपाल भोंगाडे, मनोहर बोभाटे संजय दुरबुडे, योगेश मेहता, दादू भोयर,रामू भोयर,शालिक पाल प्रवीण गायकवाड, महेश भोयर,सचिन राडे,किरण हांडे,आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.







