
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी : नरेश राऊत राळेगाव :- श्री गुरुदेव सेवा मंडळ व समस्त ग्रामस्थ गुजरी नागठाणा तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ द्वारा दिनांक 26 डिसेंबर व शुक्रवार ते 28 डिसेंबर रविवार 2025 ला श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर चे प्रांगणात तुकडोजी महाराज यांचा 57 वा व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचा 69 वा पुण्यस्मरण महोत्सव आयोजित असून दैनिक ग्रामसफाई सामुदायिक प्रार्थना सामुदायिक ध्यान खंजिरी भजन ग्रामगीता वाचन कीर्तन प्रवचन व इतर विविध रचनात्मक प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित आहे .दिनांक 26 डिसेंबर शुक्रवार ला सकाळी सात वाजता कलश स्थापना नऊ वाजता झेंडावंदन महोत्सवाचे उद्घाटन जानरावजी गिरी उपनगराध्यक्ष नगरपंचायत राळेगाव यांचे शुभहस्ते ,संजयजी घीया तुळशी इंडस्ट्रीज राळेगाव यांचे अध्यक्षतेखाली विलासराव भोयर ,प्रदीप ठुने ,राजूभाऊ नागतूरे हमीदभाई पठाण मधुकरराव गेडाम वाल्मिकराव मेश्राम भगवानजी धनरे कृष्णाजी राऊळकर शंकरराव तोडासे एडवोकेट किशोर मांडवकर सुधीर चौधरी रामभाऊजी कोवे उमेश भोयर गोविंदराव झोड पी डी मेंडुलकर नंदूभाऊ टिपणवार सायंकाळी सात ते दहा वाजता खुशाल वैद्य नागपूर व संच यांचा संगीतमय भारुड दिनांक 27 डिसेंबर शनिवारला दुपारी दहा ते तीन वाजता कलावंत मार्गदर्शन मेळावा एडवोकेट श्याम खंडारे संस्थापक अध्यक्ष तुकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास व सन्मान संस्था महाराष्ट्र राज्य ,सिद्धार्थ भवरे राज्या उपाध्यक्ष चित्रसेन बोदेले सीनियर मॅनेजर ,अमोल रंगारी सीनियर मॅनेजर इंडियन पोस्ट बँक यवतमाळ, संजय भोंडे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काटोल, जिल्हा नागपूर यांचे मार्गदर्शनपर राजेश मडावी पूर्व विभाग यवतमाळ जिल्हाध्यक्ष मुरलीधरराव धनरे पूर्व विभाग यवतमाळ जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर चौधरी राळेगाव तालुका कार्याध्यक्ष सय्यद युसुफ अली सामाजिक कार्यकर्ते रालेगाव सुनील गोंडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक पुसद प्रकाश गोंडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक माढळं नागपूर, कवी तथा साहित्यिक प्रमोद बाकडे सेवानिवृत्त नायब तहसीलदार संदीप सुरकर , निवास्कर कांबळे, प्रवीण नेरकर, कैलास कोडापे (पत्रकार)यांचे उपस्थितीत सायंकाळी सात ते दहा वाजता हरिभक्त परायण आकाश टाले सावंगी नागपूर व संच यांचा सप्त खंजिरी वादक व मनोरंजनात्मक प्रबोधन पर राष्ट्रीय ग्रामगीतेवर कीर्तन .दिनांक 28 डिसेंबर रविवारला सकाळी सात वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगे महाराज यांचे प्रतिमेची भजन दिंडीसह शोभायात्रा दुपारी बारा वाजता ह भ प ज्ञानेश्वर रोकडे महाराज कळब यांचे काल्यावर कीर्तन. समारोप कार्यक्रम चित्तरंजन दादा कोल्हे, प्रशांत तायडे ,विनोद काकडे, डॉक्टर कुणाल भोयर राजूभाऊ तेलंगे ज्ञानेश्वर मुडे गणेश फटिंग अरुण खंगार शेरअलीबापू लालाणी आणि किशोर कांडरवार रुपेश रेंगे पुनीत मातकर अधिव्याखते dicped यवतमाळ. यांचे उपस्थितीत व मार्गदर्शनपर्व आणि तीन वाजता महाप्रसाद कृपया पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून प्रबोधनाचा लाभ घ्यावा असे आयोजक मंडळाकडून विनंती करण्यात येत आहे.





