संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी शेख इरफान शेख ईसा तर सचिव रितेश पाटील कदम यांची निवड.

0
11

एकमताने २०२६ ची कार्यकारणी गठीतयवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / नरेश राऊत उमरखेड : मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते पत्रकार दिनाचे औचित्य साधून उमरखेड तालुक्यातील डॅशिंग निर्भीड निष्पक्ष कार्य करीत असणाऱ्या संयुक्त पत्रकार संघाची दरवर्षीप्रमाणे यावर्षीची नवीन कार्यकारीणीची निवड दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह उमरखेड येथे एकमताने गठित करण्यात आली. संयुक्त पत्रकार संघाचे मार्गदर्शक श्री. शिवाजीराव माने यांचे मार्गदर्शनानुसार तसेच माजी अध्यक्ष सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी(माजी अध्यक्ष)यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शासकीय विश्रामगृहाचे दिवंगत कर्मचारी स्वर्गीय खलील भाई यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तदनंतर सन २०२६ या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड पुढील प्रमाणे करण्यात आली सदर कार्यकारणी मध्ये संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्ष पदी श्री.शेख इरफान शेख ईसा तर सचिव पदी श्री रितेश पाटील कदम तसेच उपाध्यक्षपदी सुरेंद्रनाथ पंजाबराव दळवी तर सहसचिव शेख तहसीन शेख भिक्कन, कोषाध्यक्ष विश्वास काळे, सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी बाबा खान लाला, , सय्यद खाजा सय्यद मौला, शेख मुजाहिद शेख इसा यांचीसदस्य पदी एकमताने निवड करण्यात आली. नवनियुक्त कार्यकारिणी चे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले संयुक्त पत्रकार संघाचे मार्गदर्शक श्री. शिवाजीराव माने यांचे मार्गदर्शनात लोकाभिमुख कार्य करण्यास सदैव तत्पर राहू असे प्रतिपादन नवीन कार्यकारिणीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here