राम मोहनलाल जोशी यांची भाजप मूर्तिजापूर शहर ‘कार्यकारी अध्यक्ष’ पदी नियुक्ती

0
14

मूर्तिजापूर (प्रतिनिधी):भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्याने तन-मन-धनाने सेवा देणारे आणि पक्ष संघटन वाढवण्यासाठी कार्यरत असणारे स्टेशन विभाग येथील श्री. राम मोहनलाल जोशी यांची भारतीय जनता पार्टी मूर्तिजापूर शहर ‘कार्यकारी अध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वासजोशी यांची ही नियुक्ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

यामध्ये प्रामुख्याने: ना. श्री. आकाशजी फुंडकर (कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अकोला) खासदार अनुपभाऊ धोत्रे (अकोला लोकसभा) डॉ. उपेंद्रजी कोठीकर (प्रदेश संघटन मंत्री, भाजप) आ. रणधिरभाऊ सावरकर (प्रदेश सरचिटणीस व आमदार अकोला पूर्व) आ. प्रकाशभाऊ भारसाकळे (आमदार, अकोट) आ. वसंतजी खंडेलवाल (आमदार, विधानपरिषद) आ. हरिषभाऊ पिंपळे (आमदार, मूर्तिजापूर विधानसभा) श्री. संतोषजी शिवरकर (जिल्हाध्यक्ष, अकोला ग्रामीण)यांनी जोशी यांच्या कार्याची दखल घेत पक्षाच्या हितासाठी ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

पक्षाचे बळकटीकरण हेच ध्येयपक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी राम मोहनलाल जोशी यांची ही निवड अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. त्यांच्या निवडीबद्दल भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, आगामी काळात त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात पक्षाची बांधणी अधिक घट्ट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या निवडीबद्दल श्री. राम मोहनलाल जोशी यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here