
*”पत्रकार संरक्षण समितीं”च्या वतीने पत्रकार दिनाचे आर्वी येथे आयोजन…!*शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पत्रकारांनी सजग राहणे गरजेचे आहे यासाठी लोकप्रतिनिधींनीही लक्ष द्यावे. – शैलेश अग्रवालसक्रिय पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव.यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / नरेश राऊत अन्यायला वाचा फोडण्याचे कामं करणारा ग्रामीण पत्रकार हा खऱ्या अर्थाने संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेच्या विचारावर जगतो, ग्रामीण विकासासाठी पत्रकारांचा कायमच संघर्ष राहिलेला आहे. त्याकामी विधिमंडळात पत्रकारांचा प्रतिनिधी असणं आवश्यक आहे. त्या कामी मला आपले पत्र दया मी स्वतः राज्यपाल यांना भेटून हा प्रश्न तडीस नेण्यासाठी तुमच्या सोबत आहे. ग्रामीण पत्रकार हे गावपातळीवरील अडी-अडचणीचे जाणकार असतात, म्हणून मी त्यांना समाजाचे टॉनिक म्हणतो असे विचार खासदार अमर काळे यांनी मांडले.पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयोजनातून पत्रकार महर्षी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त होणारा कार्यक्रम (दि.६ जानेवारी २०२६ रोजी) आर्वी जि. वर्धा येथे उत्साहात झाला. यावेळी विदर्भातील कृतिशील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव शाल, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याबद्दल गौरवं करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पत्रे होते तर उदघाट्न खासदार अमर काळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख मान्यवर म्हणून आमदार दादाराव केचे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, आर्वीच्या नगराध्यक्षा स्वाती गुल्हाने, शेतकरी आरक्षणाचे प्रणेते शैलेश अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकांत ढोले, तहसीलदार हरीश काळे, राज्य उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राम खुर्दळ, डॉ सय्यद मजीद, युवा पत्रकार आशिष घुमे, पत्रकार संरक्षण समिती वर्धाचे कार्याध्यक्ष सत्तार शेख, जिल्हाध्यक्ष शशांक चतारे, इत्यादी मान्यवर व्यासपीठावर होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुष्प वाहून पूजन करण्यात आले. व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून पत्रकार दिन-२०२६ चे औपचारिकता उदघाटन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर अनेक स्वागतमूर्तिनी आपापले कार्य व पत्रकारितेतील अनुभवं मांडले. त्यानंतर आमदार दादाराव केचे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,’बदलत्या काळात आपल्याकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहे. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला ग्रामीण पत्रकारितेच्या कष्टाची जाणीव आहे’. पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत ढोले यांनी सांगितले की “पत्रकार समाज व सरकार यामधील दुवा आहे. लेखणीद्वारे तो सातत्याने उपेक्षिताचे मुद्द्याना वाचा फोडतो’. शेतकरी नेते शैलेश अग्रवाल यांनी सांगितले की ग्रामीण पत्रकार हा शेतकरी, गाव खेड्यातील विद्यार्थी यांचे सारखा उपेक्षित घटक आहे, त्याला संरक्षण मिळणे आवश्यक बाब आहे, त्याच्या कौटुंबिक आर्थिक स्थितीचा ही शासनाने विचार करावा. शेतकरी कष्टकऱ्यांचा आवाज असलेला ग्रामीण पत्रकार यांना मूलभूत सेवा दिलीच पाहिजे. अधिस्वीकृतीत ग्रामीण पत्रकार व कार्यालयीन कोट्यातून अधिस्वीकृती घेणारा शहरी पत्रकार असा भेद नको, या खडतर मार्गातील ग्रामीण पत्रकाराना न्याय मिळाला पाहिजे’.तत्पुर्वी पत्रकार दिनाचे मुख्य वक्ते, पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष राम खुर्दळ यांनी “ग्रामीण पत्रकारितेचे आजचे वास्तव” विषयावर मांडणी करताना सांगितले की, पाच महिने पूर्वी ग्रामीण पत्रकाराचे राज्यस्तरीय विचार संमेलनाची आठवण करून देतांना राज्यशासन, मंत्री आमदार खासदार यांना निवेदन दिले मात्र विषयांचे गांभीर्य अजूनही लोकप्रतिनिधीना समजले नाही,हिवाळी अधिवेशनात याबद्दल तारांकित मुद्दा उपस्थित केला नाही, आम्ही रस्त्यावर येऊन मूलभूत मुद्द्यासाठी लढतोय, मात्र शासकीय सेवा अधिस्वीकृतीधारकांना मिळतात, आम्ही कायमच वंचित राहिलोय. अजूनही पत्रकार हल्लाविरोधी कायद्याचा लाभ ग्रामीण पत्रकाराना का नाही? वैयक्तिक व कौटुंबिक विमा, पेन्शन सरकार देत नाही,ग्रामीण पत्रकाराना अधिस्वीकृती मिळत नाही त्यासाठी जाचक अटी शर्ती आहेंत, ग्रामीण पत्रकारा वर हल्ले झाल्यास त्याला आधार नसतो मात्र बड्या पडस्थ पत्रकाराना ग्रामीण पत्रकार नेहमी आधार देतात, ग्रामीण पत्रकाराना राज्यभर स्वतंत्र्य पत्रकार भवन नाही, आर्थिक दुर्बल ग्राम पत्रकाराना घरकुल योजना का नाही? पत्रकार अपघात झाल्यास आजारी पडल्यास त्याला शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे? विविध अशासकीय समित्यावार आम्हांला डावलले जाते. जिल्हा माहिती कार्यालयात ग्रामीण पत्रकार नोंद नसते, शासकीय प्रेस ला ते ग्रामीण पत्रकारा ना उभं ही करीत नाही आम्ही पाठपुरावा करतोय पण सरकार त्यांचे नेते, माहिती विभाग आमची उपेक्षा करत आहे.[पत्रकार संरक्षण समितीच्या पत्रकार दिनी सक्रिय पत्रकार व समाजसेवक यांचा गौरवं झाला यामध्ये सत्कार मुर्ती पत्रकार सौ. उज्वला घोडे, निरज त्रिपाठी, गोल्ड मॅडलिस्ट पत्रकार अमोल सोटे, गणेश शेंडे, डॉ. प्रकाश राठी, बबलु खान, सुधाकर बोबडे, राजु कांबळे, रा. मोझरी (शेकापुर), संतोष देशमुख, नरेश चरडे, रवि साखरे, शेख युसुफ शेख ईशाफ तर समाज सेवक म्हणून अरूण कहारे, डॉ. सैय्यद अबरार सैय्यद मजीद, नितीन बनकर, चंद्रमणी मुन, नितीन चंदनखेडे, परमेश्वर नरवटे, रामेश्वर पडोळे, राजश्री जमनारे तसेच विशेष सामाजिक सत्कार मुर्ती आर्वीच्या नगराध्यक्षा स्वाती प्रकाश गुल्हाणे, डॉ. रिपल राणे, युवा समाजसेवक आशीष घुमे वरोरा, सपना नरेंद्र मांडवकर यांचा सत्कार करण्यात आला. सर्व सत्कार मूर्तीना सन्मानचिन्ह स्व. जमनाबाई मोहनलालजी जावंधीया स्मृती प्रित्यर्थ शेतकरी नेते विजय जावंधीया व दैनिक विधाताचे संस्थापक स्व.डॉ. मोहनलाल जैन स्मृती प्रित्यर्थ पत्रकार प्रदिप जैन यांचे कडून देण्यात आले.]या कार्यक्रमात विदर्भ सहसचिवपदी रवि चरडे व जिल्हा प्रवक्ते म्हणून ग्रामगितचार्य गजानन भोरे यांच्यासह आर्वी, आष्टी, कारंजा (घाडगे) या तालुक्यातील पत्रकारांच्या नियुक्ती करण्यात आल्या व त्यांचा ओळखपत्र देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदिप रघाटाटे व संचालन प्रा. कल्याणी संजय वानखेडे यांनी केले. तर आर्वी तालुका अध्यक्ष प्रा. राजेश सोळंकी यांनी सर्वांचेआभार मानले. कार्यक्रमाला जिल्हा सचिव योगेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष जितू गोरडे, जिल्हा संघटक प्रशांत आजनकर, जिल्हा कोषाध्यक्ष सतिश काळे, जिल्हा सहसचिव इकबाल शेख, जिल्हा प्रवक्ते गजानन भोरे, जिल्हा महिला सचिव आरती कारंजेकर, जिल्हा सहसंघटक राहुल मून, प्रविण करोले, प्रशांत अवचट, तालुकाध्यक्ष संजीव वाघ, प्रा. प्रदिप झुटी, शिवाजी चंदीवाले, गजानन जिकार, विवेक हांडे, बाळू मुंगले, जगदीश कुर्डा, ओंकार दंडाळे, सय्यद सर व जिल्यातील पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इकबाल शेख, पंकज गोडबोले, मनोज राऊत, टेकचंद मोटवानी, दिनेश सोळंके, नारायण घोडे यांनी परिश्रम घेतले.








