
अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपने थेट **एमआयएमसोबत आघाडी** करून सत्ता स्थापन केली आहे. नगरपालिकेत स्पष्ट बहुमत नसलेल्या भाजपने **५ नगरसेवक असलेल्या एमआयएमला सोबत घेत** ‘अकोट विकास मंच’ स्थापन केला आहे.
विशेष म्हणजे, या मंचात केवळ एमआयएमच नाही तर **दोन्ही सेना, दोन्ही राष्ट्रवादी आणि बच्चू कडूंची प्रहार जनशक्ती पार्टी** यांचाही समावेश आहे. निवडणुकीदरम्यान “हिंदुत्व”, “बटेंगे तो कटेंगे ” अशा घोषणांनी मतदारांना साद घालणाऱ्या भाजपची ही भूमिका आता **राजकीय तडजोडींचा नवा अध्याय** उघडणारी ठरत आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपकडे बहुमत नसल्याने सत्तेसाठी ही आघाडी अपरिहार्य असल्याचे सांगितले जात असले, तरी **हिंदुत्वाच्या नावावर मत मागणाऱ्या पक्षाची एमआयएमसोबतची युती** अनेक प्रश्न उपस्थित करते.*हिंदुत्वाचा मारा करणारा भाजप आज सत्तेसाठी तत्त्वांना तिलांजली देतोय का?* असा सवाल आता सामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
अकोटमधील या घडामोडींमुळे भाजपच्या भूमिकेवर टीकेची झोड उठत असून, **निवडणुकीतील घोषणा आणि सत्तेतील व्यवहार यातील विसंगती** पुन्हा एकदा समोर आली आहे. सत्तेसाठी कुठे गेला तो आक्रमक नारा? असा थेट प्रश्न मतदार विचारत आहेत.





