
अकोला (प्रतिनिधी मनीष राऊत):जिल्ह्यातील बोरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटेपूर्णा आणि कांशिवणी परिसरात अवैध वरली मटक्याचा व्यवसाय सध्या जोरात सुरू असून, यामुळे ग्रामीण भागातील तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. विशेष म्हणजे, पोलीस प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कठोले, खेळकर आणि काटेपूर्णा बदे हे मुख्य संशयित हे अवैध धंदे चालवत असल्याची चर्चा परिसरात रंगली असतानाही पोलीस कारवाई का करत नाहीत? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे.बीट जमदारांचा वरदहस्त? संशयाची सुई पोलिसांकडेमिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बोरगाव पोलीस स्टेशनमधील एका बीट जमादाराचा या अवैध धंद्यांना मोठा पाठिंबा असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे अवैध धंदे बिनधास्तपणे सुरू राहण्यासाठी बोरगाव मंजू पोलीस ठाण्याला दरमहा ६० ते ७० हजार रुपयांचा हप्ता दिला जात असल्याची धक्कादायक चर्चा सध्या वाऱ्यासारखी पसरली आहे. जर रक्षकच भक्षक बनत असतील, तर दाद कोणाकडे मागायची? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.पोलीस अधीक्षक महोदय, हे तुम्हाला माहित आहे का?अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक हे आपल्या शिस्तीसाठी ओळखले जातात. मात्र, त्यांच्याच नाकाखाली बोरगाव हद्दीत सुरू असलेला हा उघड माळका व्यवसाय त्यांना माहिती आहे की नाही? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. की खालच्या पातळीवरील पोलीस अधिकारी वरिष्ठांची दिशाभूल करत आहेत?युवा पिढीचे भविष्य धोक्यातकाटेपूर्णा आणि परिसरातील अनेक तरुण या जुगाराच्या आहारी गेले आहेत. कष्टाने कमावलेला पैसा मटक्यात उडवला जात असल्याने अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. भविष्यात यामुळे गुन्हेगारी वाढण्याची दाट शक्यता आहे. पोलिसांच्या या हप्तेखोरीमुळे आणि निष्क्रियतेमुळे सामान्य नागरिक आता प्रशासनाकडे अत्यंत संशयाच्या नजरेने पाहत आहेत.नागरिकांची मागणी: तातडीने कारवाई व्हावी!काटेपूर्णा आणि कांशिवणी येथील हे ‘वरली सम्राट’ कुणाच्या आशीर्वादाने माजले आहेत? याचा शोध घेऊन पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे आणि संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. अन्यथा, नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील, असा इशाराही काही संतप्त नागरिकांनी दिला आहे.मुख्य ठळक मुद्दे: * काटेपूर्णा व कांशिवणीत , यांचे साम्राज्य. * बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला दरमहा ७० हजारांच्या हप्त्याची चर्चा. * बीट जमादाराच्या भूमिकेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह. * पोलीस अधीक्षक या ‘भ्रष्ट’ साखळीचा पर्दाफाश करणार का?







