
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी/नरेश राऊत
राळेगाव तालुका आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जाते. माञ राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संपुर्ण गावामध्ये अवैध धंद्यांना ऊत आला आहे. राळेगाव शहरामध्ये आदिवासी मुलीच्या होस्टेल जवळ व मध्यवर्ती सहकारी बँक जवळ खुलेआम पद्धतीने दारु विक्री होताना दिवत आहे माञ याकडे राळेगाव पोलीस दुर्लक्ष का करतात असा प्रश्न सर्व सामान्य जनता करताना दिसत आहे. तसेच राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या संपूर्ण गावामध्ये अवैध दारु, रेती, तस्करी , मटका, जुगार खुलेआम पद्धतीने चालु आहे. माञ याकडे राळेगाव पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. की काय असा प्रश्न सामान्य जनता करताना दिसत आहे. या अवैध धंद्यामुळे अनेक लोकांना ञास सहन करावा लागत आहेत. राळेगाव हे अवैध धंद्याचे माहेर घर बनले आहे, या गंभीर अवैध कृत्यावर स्थानिक पोलीस प्रशासन कोणतेही ठोस कारवाई करता दिसत नाही कारण काय आहे तरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी राळेगाव तालुक्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे आता जनता बोलतानी दिसत आहे माञ विशेष.







