माजी व्यक्तीला महागड्या भेटवस्तू दिल्याबद्दल समंथाला पश्चाताप; आता म्हणतात ‘निरुपयोगी’!

0
23

समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. ऑगस्ट महिन्यात त्याने गर्लफ्रेंड सोभिता धुलिपालाशी साखरपुडा केला होता. नाग चैतन्यला दिलेल्या महागड्या गिफ्ट्सबद्दल समंथाने पश्चात्ताप व्यक्त केला आहे.

अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूची ‘सिटाडेल: हनी बनी’ ही वेबसिरीज अलीकडेच पडद्यावर आली. यात अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत दोघांनी विविध प्रश्नांची मजेशीर उत्तरे दिली. यावेळी ‘रॅपिड फायर’ राऊंडमध्ये दोघांनी एकमेकांना रंजक प्रश्न विचारले. वरुणने समंथाला विचारले, “तुम्ही आतापर्यंत खर्च केलेली सर्वात महागडी वस्तू कोणती?” समांथाच्या या उत्तराने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

“तू सर्वाधिक पैसा खर्च करून कोणती निरुपयोगी गोष्ट घेतलीस”, असा प्रश्न विचारल्यावर समंथा म्हणते, “माझ्या एक्सच्या (एक्स बॉयफ्रेंड/पती) महागड्या भेटवस्तूंसाठी.” यावरून समंथाला तिचा पूर्व पती नाग चैतन्यला दिलेल्या महागड्या भेटवस्तूंबद्दल पश्चात्ताप वाटत असल्याचं नेटकरी म्हणाले. समंथाने दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांनंतर 2021 मध्ये हे दोघं विभक्त झाले. समंथाला घटस्फोट दिल्याच्या तीन वर्षांनंतर आता नाग चैतन्य दुसऱ्यांदा लग्न करत आहेत. अभिनेत्री सोभिता धुलिपाला हिच्याशी तो दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. या दोघांचा साखरपुडा नुकताच पार पडला.

समंथा तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे. नाग चैतन्यला घटस्फोट दिल्यानंतर तिला मायोसिटीस या ऑटोइम्युन आजाराचं निदान झालं. यावर उपचार घेण्यासाठी तिने कामातून काही काळ ब्रेक घेतला होता. आता ती पुन्हा कामावर परतली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने आई होण्याचीही इच्छा बोलून दाखवली. “मला वाटत नाही की या गोष्टीला उशीर झाला आहे. आई होण्याची स्वप्नं माझी अजूनही आहेत. अर्थातच मला आई व्हायला आवडेल. मला नेहमीच आई होण्याची इच्छा होती. तो खूप सुंदर अनुभव असेल. मी याबद्दल नक्कीच विचार करेन. लोक नेहमीच वयाबद्दल काळजी व्यक्त करतात. पण माझ्या मते आई होण्यासाठी असा काही निश्चित वेळ लागत नाही”, असं समंथा म्हणाली होती.

मायोसिटीस म्हणजे काय?

मायोसिटिस ही आरोग्याची अशी एक स्थिती आहे ज्यामध्ये स्नायूंमध्ये तीव्र वेदना होतात. मायो म्हणजे स्नायू आणि आयटीस म्हणजे जळजळ (वेदना). याला व्हायरल इन्फेक्शन, विशिष्ट औषधं आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती अशी विविध कारणं कारणीभूत असू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here