मनसे नसती तर उद्धव ठाकरे यांचा खेळ दहा जागांवर आटोपला असता,काय सांगते आकडेवारी

0
38

राज ठाकरे यांच्या मनसेला विधानसभा निवडणूकीत एकही जागा मिळालेली नसली तरी त्यांच्या मते खाण्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा फायदा झालेला दिसत आहे.महाराष्ट्रात भविष्यात मनसेची मते राजकारणात नवीन समीकरणे तयार करु शकते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ( मनसे ) एकही आमदार निवडून आला नसला तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचा मोठा फायदा केला आहे. राज्यात उद्धव ठाकरे यांच्या युबीटीने जिंकलेल्या २० जागांमध्ये १० जागा अशा आहेत. ज्यात मनसेच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे विजयाचे अंतर निश्चित केले आहे. त्यापैकी ८ जागाा मुंबईतील होत्.या आणि दोन राज्यातील इतर ठिकाणच्या आहेत. या दहा जागांवर जर मनसेने निवडणूक लढविली नसती तर उद्धव ठाकरे यांच्या जागा घटून दहा राहिल्या असत्या. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पर्यायाने महायुतीला दहा अतिरिक्त जागा मिळाल्या असत्या. त्यामुळे निवडणूकीचे गणितच बदलले असते.

या जागा जेथे युबीटीला मनसेमुळे फायदा झाला

मुंबईतील माहीम, वरळी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दीडोंशी, वर्सोवा,कालिना आणि वांद्रे पूर्व तर महाराष्ट्रातील वणी आणि गुहागर

जागेनुसार विश्लेषण –

माहिम –

मनसेचे हरलेले उमेदवार : राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे (मते – ३३,०६२ )

युबीटीचे विजयी उमेदवार – महेश सावंत (मते – ५०,२१३ मते )

शिंदे गटाचे हरलेले उमेदवार – सदा सरवणकर ( मते- ४८,८९७ )

विजयाचे अंतर – १,३१६ मते

वरळी –

मनसेचे हरलेले उमेदवार – संदीप देशपांडे ( मते – १९,३६७ )

युबीटीचे विजयी उमेदवार – आदित्य ठाकरे ( मते- ६३,३२४ )

शिंदे गटाचे हरलेले उमेदवार – मिलिंद देवरा ( मते -५४,५२३ )

विजयातील अंतर – ८,८०१ मते

विक्रोळी

मनसेचे हरलेले उमेदवार – विश्वजीत ढोलम ( मते -१६,८१३ )

युबीटीचे विजयी उमेदवार – सुनील राऊत ( मते – ६६,०९३ )

शिंदे गटाचे हरलेले उमेदवार – सुवर्णा करंजे ( मते – ५०,५६७ )

विजयातील अंतर – १५,५२६ मते

जोगेश्वरी पूर्व

मनसेचे हरलेले उमेदवार – भालचंद्र अंबुरे (मते – १२,८०५ )

युबीटीचे विजयी उमेदवार -अनंत (बाळा ) नर ( मते – ७७,०४४ )

शिंदे गटाचे हरलेले उमेदवार – मनीषा वायकर ( मते ७५,५०३ )

विजयातील अंतर – १,५४१

दिंडोशी

विजयातील अंतर – ६,१८२ मते

युबीटीचा विजयी उमेदवार – ( मते- ७६,४३७ )

मनसेची मते – ६,७५२

वर्सोवा

विजयातील अंतर – १,६०० मते

युबीटी विजयी उमेदवार – ६५,३९६ मते

मनसेची मते – ६,७५२

कालिना

विजयातील अंतर – ५,००८ मते

युबीटीचे विजयी उमेदवार – ( ५९,८२० मते )

मनसेची मते ( ६,७५२ )

वांद्रे पूर्व

विजयातील अंतर ( ११,३६५ मते )

युबीटीचे विजयी उमेदवार ( ५७,७०८ मते )

मनसेची मते – ६,०६२

वणी

विजयातील अंतर -१५,५६० मते

युबीटीचे विजयी उमेदवार ( ९४,६१८ मते )

मनसेची मते ( २१,९७७ )

गुहागर

विजयातील अंतर – २,८३०

युबीटीचे विजयी उमेदवार – ७१,२४१ मते

मनसेची मते – ६,७१२

तर शिंदे गटाचा फायदा झाला असता

मनसेच्या उमदेवारांनी शिंदे गटाला आठ जागांवर निर्णायक नुकसान केले आहे. त्यापैकी बहुतांश जागा मुंबईतील आहेत, त्यामुळे युबीटीला आपला मुंबईतील स्थान राखता आले. वरळी, माहीम, वांद्रे पूर्व जागा महत्वाच्या ठरल्या. जर मनसेने दहा जागावर निवडणूक लढली नसती तर येथे शिंदे गटाचा फायदा झाला असता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दहा जागा कमी झाल्या असत्या. महायुतीच्या जागा २३० वरुन २४० झाल्या असत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here