इविंन येथील डे-केअर युनिटमध्ये रोज आवश्यक २० बॉटल रक्त

0
35

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डे-केअर युनिटमध्ये सिकलसेल, थैलेसेमियाग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात. या रुग्णांना दर महिन्यातून किंवा दोन महिन्यातून रक्त द्यावे लागते. या रक्तावरच या रुग्णांचे जीवन अवलंबून आहे. या युनिटमध्ये रोज सरासरी २० ते २२ रुग्ण हे रक्त घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान चळवळ ही लोकचळवळ होणे गरजेचे आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान आहे.आपल्या रक्तदानामुळे आपण एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. जिल्ह्यात रोज शेकडो रुग्णांना रक्ताची गरज भासते. परंतु त्या तुलनेत रक्त उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना रक्ताअभावी जीव गमावण्याची वेळ येते. जिल्ह्यात प्रामुख्याने रक्ताची गरज ही सिकलसेल, थैलेसेमिया अपघातग्रस्त रुग्ण, सिझेरियन प्रसूती, हिमोग्लोबिन कमी असलेले रुग्ण, विविध गंभीर आजारावरील आवश्यक शस्त्रक्रिया करतेवेळी संबंधित रुग्णाला देखील रक्ताची गरज असते. जिल्ह्यात सिकलसेल रुग्णांची संख्या ही ६०० तर थैलेसेमियाचे देखील ४५० च्या जवळपास रुग्णांची संख्या आहे.

यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डे-केअर युनिटमध्ये जवळपास उपचारासाठी रोज ३० ते ३५ रुग्ण रुग्ण दाखल होत असून यातील २० रुग्णांना रक्त चढविणे गरजेचे असते. त्यामुळे रुग्णांचे प्राण वाचविण्याकरिता अमरावतीकरांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. *बुधवारी असा उपलब्ध होता रक्तसाठा बुधवारी ई-रक्तकोषवर अद्ययावत करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार इर्विन रक्तपेढीत ८ बॅग, डॉ. सदानंदजी बुर्मा ट्रस्ट रक्तपेढी परतवाडा येथे ० बॅग, संत गाडगेबाबा रक्तपेढी ३ बॅग, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रक्तपेढी ६ बॅग, श्री बालाजी रक्तपेढीत ० बॅग, राजेंद्र गोडे रक्तपेढी ०, धारणी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी येथे ८ बॅग, तर जय माता दी मेळघाट रक्तपेढी येथे ५ बॅग रक्त्तसाठा उपलब्ध होता. सिझेरियन प्रसूतीमध्येही पडते रक्ताची गरज जिल्हा स्त्री रुग्णालय येथे रोज २५ ते ३० महिलांची प्रसूती होते. यामध्ये काही महिलांची प्रसूती ही बाळा आणि आईच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिझेरियन करावी लागते, यावेळी सिझेरियन दरम्यानही काही महिलांना रक्ताची गरज भासते. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय येथील रक्तपेढीतून या महिलांना रक्त उपलब्ध करण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here