राज्यात हुडहुडी वाढणार! पुढील 10 दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या वातावरणाचा अंदाज

0
18

महाराष्ट्रातील वातावरणात (Maharashtra Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण तर कुठं थंडीचा कडाका जावत आहे.

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील वातावरणात (Maharashtra Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं ढगाळ वातावरण तर कुठं थंडीचा कडाका जावत आहे. दरम्यान, फिंजल चक्रीवादळाने (Cyclone Finjal) डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी घालवल्यानंतर, पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे (Manikrao Khule)  यांनी दिली आहे.

पुढील 10 दिवस थंडी वाढणार

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून खान्देश, नाशिक पासून थंडीत हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील 10 दिवस म्हणजे बुधवार दिनांक 18 डिसेंबर(संकष्टी चतुर्थी) पर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने  म्हणजे मंगळवार 10 डिसेंबरनंतर जाणवण्याची शक्यता असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. 

विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाही 

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही. विदर्भातही आज व उद्याच तूरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परवा, मंगळवार 10 डिसेंबरनंतर तिथेही वातावरण निवळेल असे खुळे म्हणाले. 

पुढील 10 दिवस कसं असेल तापमान?

पुढील 10 दिवसातील पहाटे 5 चे किमान व दुपारी 3  चे कमाल अशी दोन्हीही तापमाने घसरून, सरासरी इतकी म्हणजे, भागपरत्वे  किमान 10 ते 12 तर कमाल 28 ते 30 डिग्री से. ग्रेड दरम्यान राहण्याची शक्यता जाणवते. 

शेतपिकांची काय काळजी घ्यावी? 

पुढील 10 दिवस थंडीचे आहेत. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. या 10 दिवसाच्या थंडीचा लाभ उठवावा, असे खुळे म्हणाले. कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून, थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here