अमरावती विभागाचा उदिष्टपूर्तीत राज्यात तिसरा क्रमांक, एसटी महामंडळाने गाठला शंभरटक्के उत्पन्नवाढीचा टप्पा

0
29

गत नोव्हेंबर महिन्याच्या १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अमरावती विभागाला प्रतिदिन ६६ लाख १३ हजारांचे उद्दिष्ट होते. विभागाने ६६ लाख ७१ हजार रुपये उत्पन्न प्राप्त करत १००.८७ टक्के आपले उद्दिष्ट प्राप्त करून विभागाने तृतीय क्रमांक पटकावला.

अमरावती विभागाचा उदिष्टपूर्तीत राज्यात तिसरा क्रमांक, एसटी महामंडळाने गाठला शंभरटक्के उत्पन्नवाढीचा टप्पा

अमरावती : राज्य परिवहन महामंडळातर्फे प्रवाशांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांमुळे सर्वसामान्यांची ‘लालपरी’ सुसाट धावत आहे. उत्पन्नाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करत अमरावती एसटी विभागाने राज्यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

गत नोव्हेंबर महिन्याच्या १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अमरावती विभागाला प्रतिदिन ६६ लाख १३ हजारांचे उद्दिष्ट होते. विभागाने ६६ लाख ७१ हजार रुपये उत्पन्न प्राप्त करत १००.८७ टक्के आपले उद्दिष्ट प्राप्त करून विभागाने तृतीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकावर रत्नागिरी विभाग, तर द्वितीय क्रमांकावर परभणी विभाग असून अमरावती विभागात राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये महिलांना अर्ध्या तिकीट दरात प्रवास करण्याची सवलत दिली आहे.याशिवाय ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठीही अर्ध्या तिकीट दरात प्रवासाची सवलत असून, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. या योजनांचा एसटीला चांगला फायदा होत आहे. परिणामी, एसटीच्या प्रवासी भारमानात चांगली वाढ झाली आहे. दिवाळी सुटीत तर १४ नोव्हेंबरपर्यंत प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे प्रवाशांनी भरभरून लालपरी धावत होत्या. अमरावती विभागानेही या सुटीच्या कालावधीत जादा बस सोडल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला होता. याशिवाय प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन गर्दीच्या मार्गावरील अतिरिक्त फेऱ्या वाढवल्या होत्या. पुणे, नागपूर व जिल्हांतर्गत मार्गावरील जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या. एकूणच एसटी महामंडळाच्या अमरावती विभागाने केलेल्या नियोजनामुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीत भर पडली आहे.एसटी महामंडळातील चालक, वाहक आणि अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे यश प्रवाशांची गर्दी पाहून त्या-त्या मार्गावर फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली होती. विभागातील सर्व चालक-वाहक, कर्मचारी, अधिकारी यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे उद्दिष्टपूर्ती होऊ शकली आहे.- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here