Chhagan Bhujbal : नाराज छगन भुजबळ नाशिकमध्ये परतणार, परदेशवारीनंतर काय भूमिका घेणार? राज्याचं लक्ष

0
11

Chhagan Bhujbal : राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे कमालीचे नाराज झाले आहेत. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. यानंतर छगन भुजबळ हे आपल्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यानंतर आज परदेशवारीनंतर ते नाशिकमध्ये परतणार आहेत. 

मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याचे दिसून आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराज असणाऱ्या भुजबळांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना यंदा महायुतीच्या मागे ओबीसीचे पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभले आहे. ओबीसींनी यंदा महायुतीला आशीर्वाद दिला. कुठल्याही परिस्थितीत ओबीसींचे नुकसान होणार नाही मी होऊ देणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे, अशी माहिती त्यांनी दिली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here