कापूस उत्‍पादकांची परवड ‘सीसीआय’नेही घटवले दर…

0
5

अमरावती : राज्यात भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) हमीदराने कापूस खरेदी सुरू असली, तरी ओलाव्याच्या प्रमाणानुसार दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी कायम आहेत. कापसाचा हंगाम सुरू होऊन आता तीन महिने पूर्ण झालेले असताना बाजारात कापसाचे भाव शेतकऱ्यांना अपेक्षित असे नाहीत. दुसरीकडे ‘सीसीआय’ने दरात कपात केल्याने त्याचा परिणाम बाजारावर जाणवणार आहे.

कापसाचे या वर्षासाठी हमीभाव मध्यम धाग्यासाठी ७ हजार १२१ रुपये तर लांब धाग्यासाठी ७ हजार ५२१ रुपये प्रति क्विंटल आहेत. मंगळवारी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत ९५ क्विंटल कापसाची आवक झाली. कापसाला किमान ७ हजार २५० तर कमाल ७ हजार ५५० रुपये म्हणजे सरासरी ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here