Prithviraj Chavan : “दिल्लीत अरविंद केजरीवाल जिंकतील”, पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ; स्पष्टीकरण देत म्हणाले…

0
6

Former CM Prithivraj Chavan on Delhi Elections 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीवरून देशभरात वातावरण तापलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीत फूट पडली असून आप आणि काँग्रेस पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवणार आहेत. दरम्यान, यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी धक्कादायक विधान केलं होतं. या विधानावर आता त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे.

IANS ला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, “दिल्लीच्या निवडणुका फार महत्त्वाच्या आहेत. मला विश्वास आहे की तिथे अरविंद केजरीवाल जिंकतील. काँग्रेसही रिंगणात आहे आणि निवडणूक लढवणार आहेत. काँग्रेस आणि आपमध्ये युती व्हायला हवी होती. मात्र तसे होताना दिसत नाही”, अशी खंत त्यांनी व्यक्त केली…

त्यांच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या वक्तव्यवर खुलासा केला आहे. काँग्रेसकडूनही त्यांच्यावर टीका झाली. ते म्हणाले, “दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबतच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. इंडिया आघाडी एकत्र लढली असती तर आघाडीचा विजय निश्चित झाला असता. आता सर्व प्रमुख पक्ष रिंगणात उतरल्याने खुली निवडणूक झाली आहे. काँग्रेस पक्षाला प्रचंड गती मिळाली आहे आणि मला खात्री आहे की आपण विजयी होऊ.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here