गाय गोऱ्हा चोरी प्रकरणातील दोघांना अटक ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त ..

0
4

मूर्तिजापूर : शहरातील स्टेशन परिसरात गोयंका नगरात ७ जानेवारीच्या रात्री ३.२० वाजेदरम्यान एका इसमाच्या गोठ्यातून एक दुधाळ गाय व एक गोहा अज्ञात इसमांनी चोरून नेला होता. या प्रकरणी शहर पोलिस स्टेशनला गुन्हा करण्यात आला होता. पोलिसांनी या घटनेचा दोन दिवसात छडा लावून दोन आरोपींना दुधाळ गाय, गोहा व मुद्देमालासह सापळा रचून ९ जानेवारीला अटक केली.


दाखल शहरातील गोयंका नगरात रहिवासी कवठा सोपीनाथ येथील शेतकरी सुभाष सुदाम बाजड (६०) हे ग्रामीण भागातील असल्याने दही दुभत्यासाठी घरी गाय पालन करीत असे. या गुन्ह्यातील आरोपी शेख अलफैन उर्फ सोहेब शेख इरफान (२३) रा. फिरदोस कॉलनी अकोला, मोसीन शहा अब्दुल शहा (३२) रा. इक्बाल कॉलनी अकोला या दोघांनी ७ जानेवारीच्या रात्री ३ वाजून २० मिनिटादरम्यान घरातील टिनाच्या गोठ्यातून दुधाळ गाय किंमत ६० हजार रू., गोह किंमत ७० हजार रू. असा एकूण १ लाख ३० हजार रूपायांचा मुद्देमाल अज्ञात ३ ते ४ इसमांनी एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जनावरांना कोंबून टाकून चोरून नेली आहे.

अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडेयांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, उपनिरीक्षक आशिष शिंदे, अंमलदार सुरेश ऊर्फ मुन्ना पांडे, सचिन दांदळे, नंदकिशोर टिकार, पोका सचिन दुबे, मंगेश विल्हेकर, गजानन खेडकर, नामदेव यांनी सदर गुन्ह्याचे तपासात यातील आरोपीतांना पो.स्टे. चे गुन्हे शोध पथकाचे मदतीने दोन दिवसात अटक कार्यवाही करण्यात आली.

आरोपीजवळून गाय व गाडी क्र. एमएच ३० सी. जे. ६२१२ किंमत ४ लाख रू व दोन मोबाइल फोन किंमत ५० हजार रू. असा एकूण ५ लाख १० हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला. अधिक तपास पोउपनि आशिष शिंदे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here