Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान

0
4

Nagpur Crime News: नागपूर जिल्ह्यातील देवलापार येथून चोरीची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रामटेक तालुक्यातील देवलापार येथील ताज राईस मिल या औद्योगिक ग्राहकाकडील तब्बल 1 कोटी 2 लाख 23 हजार 894 रुपयांची वीज चोरी महावितरणच्या भरारी पथकाने उघडकीस आणली आहे.

 या कारवाईत तडजोडीच्या रकमेपोटी 13 लाख 10 हजाराच दंड देखील ठोठविला आहे. संपुर्ण विदर्भात एवढ्या मोठ्या रकमेची वीज चोरी पहिल्यांदाच उघडकीस आली आहे. याप्रकरणी ताज राईस मिलचे शफ़िक अंसारी यांच्या विरोधात रामटेक पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003, सुधारीत 2007 च्या कलम 151 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या चोरीच्या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

तब्बल 1 कोटी 2 लाख 23 हजार 894 चे महावितरणचे आर्थिक नुकसान

महावितरणचे पथक देवलापार येथील ताज राईस मिलचा विजपुरवठा व संच तपासणी करण्याकरिता गेले असता तेथे विज वापराची नोंद होण्यासाठी असलेल्या थ्री फेजच्या औद्योगिक विज मीटरला महावितरणचे सील नव्हते, सोबतच अतिरिक्त केबल जोडून वीज पुरवठा सुरू होता.

या सर्व प्रकाराची योग्य शहानिशा करून ग्राहकाने अवैधरीत्या विज पुरवठा घेत मागील 12 महिन्याच्या कालावधीत 4 लाख 90 हजार 32 विज युनिटचा अवैध वापर करून तब्बल 1 कोटी 2 लाख 23 हजार 894 चे महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सध्या सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here